अवैध गुटखा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची कार्यवाही

0
Spread the love

अमरावती

सह संपादक – रणजित मस्के

मा.श्री. विशाल आनंद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी अमरावती जिल्हयात गुटखा तस्करी करणा-या इसमांवर बारकाईने लक्ष देवून जास्तीत जास्त केसेस करुन गुटखा विक्रीवर आळा घालणे संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा. तसेच पोलिस स्टेशन यांना आदेशित केले आहे.

त्या अनुषगांने दिनांक १५/०४/२०२५ रोजी स्थागुशा, अमरावती ग्रा. चे पथक पो. स्टे. तिवसा हददीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली कि, नागपुर कडुन अमरावती अकोला कडे एक कंटेनर मध्ये महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा अवैधरित्या वाहतुक करून येणार आहे.

अशा गोपनिय खबरेवरुन स्थागुशा पथक तळेगाव ते तिवसा हायवेवर ग्राम वरखंड जवळ सापळा लावुन बसले असता तळेगाव कडुन तिवसा कडे एक कंटेनर संशयितरित्या येत असतांना दिसला. त्या कंटेनर ला थांबुन पाहणी केली असता कंटेनर मध्ये एक इसम वसुन दिसला त्यांला त्यांचे नाव गाव विचारले असता वाहन चालक याने त्याचे नाव गुलाब सरमन अहेरवार वय ४४ वर्ष, रा.गोना, तहसिल पाली, जिल्हा ललीतपुर, राज्य उत्तरप्रदेश असे सांगितले. त्यांचे कंटेनर ची पंचासमक्ष झडती केली असता कटेनर मध्ये १०० पोते बहार सुगंधीत पान मसाला व बिएचआर सुगंधीत तंबाखु कि.अं. ३६,६०,०००/- रुपयाचा माल मिळुन आला. सदर माल हा दिल्ली येथुन आणुन अकोला येथे घेवुन जात असल्याचे गुलाब सरमन अहेरवार याने सांगितले. वरुन त्याचे ताब्यातुन ३६,६०,०००/-रुपयाचा मानवी आरोग्यास व जिवीतास धोका करणारा तवांखुजन्य सुगंधीत पानमसाला व सदर गुटखा वाहतुक करण्याकरीता वापरलेले कटेनर क. RJ 11 GC 0352 कि.अं. ३५,००,००० रु आणि सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन कि. अं.१०,०००/- रू असा एकुण ७९,७०,००० रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पो स्टे तिवसा यांचे ताब्यात देवुन त्याचेवर कलम १२३,२२३,२७४,२७५,३(५) भा. न्या.सं. सहकलम ५९ अन्न सुरक्षा मानके अधिनीयम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री. विशाल आनंद सो, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा., मा.श्री. पंकज कुमावत सो., अप्पर पोलिस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात श्री.किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अम.ग्रा.यांचे नेतृत्वात पो.उप.नि. सागर हटवार, मुलचंद भांबुरकर, पोलिस अंमलदार बळवंत दाभणे, रविंन्द्र बावणे, भुषण पेठे, मंगेश लकडे, सचीन मसांगे, चालक संजय प्रधान यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट