अवैध धारधार तलवार बाळगणा-या एकास स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी घेतले ताब्यात..

सह संपादक -रणजित मस्के
जालना

जालना जिल्हयात अवैध धारधार शस्त्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. अजय कुमार बसंल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या.
त्यावरुन श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना त्यांचे गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की, पावरलूम जुनी एम.आय.डी.सी जालना परिसरात प्रमेश बालाजी कदम हा धारधार तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची खात्रीलायक बातमी मिळाले वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना सदर आरोपीस ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने सदर आरोपीतांचाशोध घेत असतांना सदर आरोपी हा पावरलूम जुनी एम.आय.डी. पसिरात आल्याने त्यांचे कडुन 1000 रु किमतीची धारधार तलवार जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपीतां विरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, श्री.योगेश उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार भाऊराव गायके, प्रशांत लोखंडे, धिरज भोसले, सोपान क्षीरसागर सर्व स्वागुशा जालना यांनी केली आहे.