अवैध बांधकाम करणा-या बांधकाम व्यावसायिक नवनाथ माने अखेर कोंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मलिकनगर, साईबाचानगर, भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर, या बागात मोठ्या प्रमाणावर पुणे महानगरपालीकेची कोणतीही परवानगी न घेता अवैध बांधकामे करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक नवनाथ महादेव माने यांचे विरुध्द पुणे मनपा कडुन अनेकवेळा गुन्हे दाखल असून सुध्दा नवनाथ माने याने परत अशा पध्दतीने अवैध बांधकाम चालु केल्याने पुणे मनपा कडुन पुणे मनपा अभियंता अमोल पुंडे यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं १०७/२५ महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४३.५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी याने मा. जिल्हा सत्र न्यायालय, पुणे यांच्याकडे दाखल गुन्ह्यात

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. सदर गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये नवनाथ माने वाने साईबाबानगर येथील इमारत पाडताना कोणत्याही प्रकराचे स्थानीक नागरीकांच्या सुरक्षीतेबाबत उपयोजना न केल्याने तसेच कोंढवा भागात एक पलेंट अनेक लोकांना विक्री करणे, ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता दमदाटी करणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सदर गुन्ह्यात भारतीय व्याय संहिता २०२३ चे कलम १२५,३५१.३१८(४) प्रमाणे दाखल गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली होती त्या गुन्ह्याच्या अनुषगांने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने शोध घेवुन त्याला दि. ०२/०४/२०२५ रोजी खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सध्या रहात्या घरातून ताब्यात घेवून त्यास मा. कोर्टासमक्ष हजर केले असता नाननीय कोर्टाने नवनाथ माने यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास मयुर वैरागकर, सहा पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट