श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी जिल्हयातील अवैध दयाविरुद प्रभावी कारवाया करून त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे भुईंज पोलीस स्टेशनमार्फत अवैध धंदयाविरुध्द कारवाईची मोहिम चालु आहे.
दि. २९/०४/२०२३ रोजी रमेश गर्जे, सपोनि भुईंज पोलीस ठाणे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे जांब तालुका वाई येथे एका इसमाने संतोष बारचे शेजारी असले मोकळ्या जागेत महिंद्रा पिकअप बोलेरो गाडी क्र.एम एच १२ एलटी ६८६७ मध्ये बेकायदेशीर दारू विक्री करिता आणुन ठेवलेली आहे. सदर माहितीचे अनुषंगाने भुईंज पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकास समक्ष बोलावुन सदर ठिकाणी छापा टाकणेबाबत सुचना दिल्या. रेडपाटीमधील पोलीस अमलदार यांनी छाप्याचे नियोजन करून बातमीच्या ठिकाणी जांब गावचे हद्दीत संतोष बारचे शेजारी असले श्री चिलाई देवी नवरात्र उत्सव मंडळ चिलाईनगर जांब कमाणीचे आतमधील तानाजी गणपत शिंदे यांचे पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकला असता इसम नामे राहुल विलास शिंदे -४३ वर्षे रा. जांब ता. वाई यांचे ताब्यात असलेल्या पांढरे रंगाची महिंद्रा पिकअप बोलेरो क्र.एम एच १२ एलटी ६८६७ मध्ये अवैधरित्या ५३ हजार ७६० रुपये किंमतीची देशी दारु मिळुन आली त्यामुळे रेडपार्टीतील अंमलदार यांनी त्याच्या ताब्यात मिळुन आलेली देशी दारू व महिंद्रा पिकअप बोलेरो गाडी क्र.एम एच १२ एलटी ६८६७ •असा एकुण ८ लाख ३ हजार ७६० रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त केला आहे.
श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. शीतल जानवे खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांचे मार्गदर्शनाखाली मुईज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, पोलीस उप-निरीक्षक रत्नदीप भंडारे, पोलीस अंमलदार राजकुमार किदंत, जितेंद्र इंगुळकर, राजाराम माने, सुशांत धुमाळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला असुन दर नमुद भुईंज पोलीस स्टेशनच्या पथकाचे पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांनी अभिनंदन केले आहे.