देश परदेशात तिकीट बुकिंग करून पाठवतो असे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या इसमास केली अटक…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बोरीवली :- आदरणीय महोदय,
जय हिंद….!

एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे गु र क्र २५५/२०२३ कलम ४०६,४२० भादवी

➡️ गुन्ह्याची थोडक्यात हकिकत
आरोपी नामे हार्दिक नलीन मेहता, गो फिरंगी ट्रॅव्हलर्स याने गुजरात येथे टूर, ट्रॅव्हल्स व हॉटेल बुकिंग करीता फिर्यादी यांचेकडून दिनांक २१/११/२०२२ ते दिनांक २५/१२/२०२२ रोजी पर्यंत एकूण रुपये १,३६,४६०/- इतकी रक्कम ट्रिप बुकींग करीता घेवुन त्यांची हॉटेलमध्ये कोणतीही बुकींग व व्यवस्था न करता त्यांची फसवणुक केली व त्यांचेकडुन घेतलेली रक्कमही त्यांना अद्यापपर्यंत परत केली नसुन त्याचे सर्व मोबाईल क्रमांक बंद केले आहेत.
म्हणून हार्दीक मेहता, गो फिरंगी ट्रॅव्हलर्स, याचे विरुद्ध कायदेशिर कारवाई होण्यास विनंती आहे अशी फिर्याद दिल्याने त्यांचा सविस्तर जबाब नोंद करून गुन्हा नोंद करण्यात आला.

➡️ फिर्यादी महिला ,३४ वर्ष

➡️ तपास :-
सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सचिन शिंदे निवेदन करतात की, सदरचा नमूद गुन्ह्यातील आरोपी हा मागील नऊ महिन्यापासून विविध पत्ते बदलून राहत असल्याने मिळून येत नव्हता तसेच त्याने मोबाईल व ऑफिस बंद करून तो पळून गेला होता , त्याकरिता आरोपिताचे मोबाईल सी डी आर चे तांत्रिक विश्लेषण करून , दिनांक २४/१०/२३ रोजी गोपनीय बातमीदार यांचेकडून खात्रीलायक बातमी समजली की नमूद गुन्ह्यातील आरोपी मिरा रोड, भायांदर परिसरात येणार आहे सदर ठिकाणी पो ऊ नि डॉ दिपक हिंडे यांचे पथकाने सापळा रचून नमूद गुन्ह्यातील आरोपी यास ताब्यात घेऊन घेऊन त्यास अटक करण्यात आली.

सदर आरोपिताने अशाप्रकारचे गुन्हे दादर, बोरीवली परिसरात केल्याचे निष्पन्न झाले आहे

➡️ गुन्हे अभिलेख
दादर पोलीस ठाणे गु र क्र २९/२०२१ कलम ४२०,४०६ भादवी

➡️ अटक आरोपी
हार्दीक नालिन मेहता, वय २८ वर्ष , पत्ता- पत्ता. जी २२, सदास्मृती टॉवर, ६० फुट रोड, भाईंदर (पश्चिम), जि. ठाणे रा. ठि. बी – १०८, चिरागनगर, शिवसेना गल्ली, पोतदार हायस्कुलजवळ, भाईंदर पश्चिम, जि. ठाणे

सदर गुन्ह्याचा तपास श्री अजय कुमार बन्सल, पो ऊ आ, परिमंडळ ११, श्री धरणेंदर कांबळे स पो आ, यांचे मार्गर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

➡️ तपास पथक

पो नी सचिन शिंदे (तपासी अधिकारी)
पो ऊ नि डॉ दिपक हिंडे
पो शी गवळी,
पो शी घोडके,
पो शी शिरसाट यानी श्री सुधिर कुडाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे,
मुंबई यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट