कामाला जातो असे सांगून निघून गेला तो परत आलाच नाही माणगांव तालुक्यातील बोर्ले बौध्दवाडीतील घटना….

0
Spread the love

✍️सचिन पवार ✍️
माणगांव रायगड

माणगांव :-माणगांव तालुक्यातील मौजे बोर्ले बौध्दवाडी येथील फिर्यादी सखाराम धोंडू मोहिते वय वर्ष ६० यांनी माणगांव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली असता मिसिंग मुलगा स्वप्नील सखाराम मोहिते हा नेहमी प्रमाणे मोल मजुरीचे काम करण्यासाठी कामाला जातो असे फिर्यादी यांना सांगून दि.७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजन्याच्या सुमारास घरातून गेला तो अद्यापर्यत घरी आला नाही म्हणून फिर्यादी सखाराम मोहिते यांनी माणगांव पोलीस ठाण्यात खबर नोंदवली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिसिंग व्यक्तीचे वर्णन स्वप्नील सखाराम मोहिते वय वर्ष ३७ रंगाने सावळा अंगाने सडपातळ उंची सुमारे ५ फूट पायात काळ्या रंगाची पॅन्ट व काळ्या रंगाचा शर्ट अशा पद्धतीने असून कोणालाही आढल्यास त्वरित संपर्क माणगांव पोलीस ठाण्यात व पोलीस हवालदार राकेश सानप 96372 86378 यां नंबरवर कळवावा. यां घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास सह पोलीस इन्स्पेक्टर गायकवाड व पोलीस हवालदार सानप हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट