आय.ए.एस.अधिकारी पुजा खेडकर यांची फरार आई अखेर पौड पोलीसांच्या ताब्यात..!

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड :-आय. ए. एस. अधिकारी पुजा खेडकर यांच्या आईला महाड हिरकणी वाडी येथील मनोहर अवकीरकर यांच्या पार्वती हॉटेल मधून अटक करण्यात आली आहे.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पुजा खेडकर यांच्या आई आरोपी असलेल्या मनोरमा खेडकर यांच्यावर पुणे पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी पौड पोलिसांनी खेडेकर यांना नोटीस बजावली असताना देखील खेडेकर या फरार झाल्या होत्या.
मात्र काल रात्री मनोरमा खेडेकर यांना महाड तालुक्यातील हिरकणीवाडी येथील एका हॉटेलमधून अटक केली आहे
पाचाड विभागातील हिरकणी वाडी येथे मनोहर अवकीरकर यांच्या पार्वती हॉटेल मधुन मनोरमा खेडेकर यांना ताब्यात घेतले असून पौड पोलीस पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com