महिलेचे कारच्या सीटवरून खाली पडलेल्या पर्समधील दागिने , रक्कम व कागदपत्रे मानपाडा पोलीसांनी कसे परत मिळवून दिले पहा..

उपसंपादक-रणजित मस्के
डोंबिवली :-मानपाडा पोलीस ठाण्याच्या हदद्दीतील रिजन्सी अनंतम संकुलात राहणाऱ्या महिला नामे सौ. कविता विंकात परब रा. रिजन्सी अनंतम, डोंबिवली पुर्व या दिंनाक-३०/०५/२०२४ रोजी पनवेल ते डोंबिवली असा कारने प्रवास करीत असताना सुयोग हॉटेल जवळ, विको नाका, डोंबिवली पुर्व येथे मध्ये त्याचे पती बसले असता कार मधील पर्स न कळत कारच्या शिटवरून खाली पडली.
नमूद पर्स मध्ये साडेतीन तोळयाचे सोन्याचे मंगळसूत्र, ११ हजार रूपये रोख रक्कम, आधारकार्ड, पॅन कार्ड, व इतर कागदपत्रे होते.



नमूद पर्स महिलेच्या लक्षात न आल्याने त्या न पाहता निघून गेल्या व सदरची पर्स थोड्यावेळाने एका मोटार सायकल वरील व्यक्तीने उचलल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले.
नमूद मोटारसायकल वरील व्यक्तीचा शोध नमूद सदर मोटारसायकलची पाठीमागील फाटलेली सीट, सीसीटीव्ही फुटेज, तसेच झोमॅटो कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आला व आज रोजी नमूद मोटारसायकल वरील व्यक्तीचा शोध घेतल्याने स्वीगी बाँय स्वप्निल राजू कोलार रा.दत्तनगर, डोंबिवली पुर्व त्याचे कडील साडेतीन तोळयाचे सोन्याचे मंगळसूत्र, ११ हजार रूपये रक्कम व पर्स परत मिळालेली आहे.
सदर कामात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कादबाने साहेब, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राम चोपडे याचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार/दिपक गडदे, पोलीस नाईक/मंदार यादव, पोलीस नाईक/विकास माळी, यांनी उत्तम कामगिरी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com