घरफोड्या – चोऱ्या करणारा अट्टल सराईत गुन्हेगार- नरेश महीलांगे अखेर गोंदिया पोलीसांचे जाळ्यात …

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
दिनांक 27 जुन 2023 रोजी चोऱ्या करणारा अट्टल गुन्हेगार नरेश महिलांगे अखेर गोंदिया पोलीसांच्या ताब्यात चोरीची क्रेटा गाडी किंमती 16 लाख रुपये , रोख रक्कम 3 लाख 25 हजार आणि साथीदारासह अटक, गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे मोठे यश आले आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणें देवरी अंतर्गत तारीख 26/03/23 चे पहाटे 04.00 ते 05.00 वां. दरम्यान श्री. श्रेय नरेंद्र कुमार जैन यांचे मौजा देवरी आमगाव रोड महावीर राइस मिल मधील नगदी 4,38,000/- रूपये आणि मौजा नवाटोला येथील श्री. यादोराव नरसय्या पंचमवार यांचे राहते घरून सोन्याचे दागिने व नगदी एकूण 62,000/- रूपये अश्या एकाच रात्र दरम्यान दोन घरफोड्या घडल्या होत्या. या अनुषंगाने फिर्यादी यांचे तक्रारी वरून पोलीस ठाणे देवरी येथे क्रमशः अप क्रं. 81/20 23, आणि अप क्रं. 82/ 2023 कलम 457, 380 भांदवी अन्वये दाखल करण्यात आले होते. तसेच पो.ठाणे डूग्गीपार अंतर्गत मौजा सडक अर्जुनी येथे दिनांक 25/03/23 चे 23.00 ते 06. 30 वा दरम्यान जिल्हा को ऑप. बँकेचे चॅनल गेट चा ताला तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता या अनुषंगाने फिर्यादी श्री.प्रमोद मेश्राम , बँक शाखा व्यवस्थापक यांचे तक्रारी वरून पो. ठाणे डूग्गीपार येथे अप क्रं 98/2023 कलम 457, 380, 511 भादंवि. अन्वये अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.
पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांनी उपरोक्त तिन्ही दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेवून गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्याच्या आणि तपासाचे अनुषंगाने सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा आणि स्थानीक गुन्हे शाखेस निर्देश सूचना दिलेल्या होत्या.
या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस स्थानीक गुन्हे शाखा आणि पो. ठाणे देवरी, डूग्गीपार पोलीस पथक गुन्हा करून फरार झालेल्या अज्ञात आरोपीतांचा कशोशिने शोध घेत होते.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया, पोलीस पथकाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दिनांक 28/03/2023 रोजी वरील नमूद तिन्ही गुन्ह्यात आरोपी नामे - प्रदीप उर्फ दादू देवधर ठाकूर व 30 वर्ष राहणार देवधर महतो, वारभाट राज्य- छत्तीस गढ यास गुन्ह्यात अटक करण्यात आली होती आणि त्याचे पासून नमूद गुन्ह्यातील 3 लाख 47, हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले होते. तसेच सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान अटक आरोपी याने त्याचा साथीदार नरेश महीलांगे याचे सोबत मिळून तिन्ही गुन्हे केल्याचे सांगून सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले होते.
त्या अनुषंगाने नमूद तिन्ही गुन्ह्यात घरफोड्या करणारा अट्टल सराईत गुन्हेगार नामे- नरेश महीलांगे रा. कळमना, नागपूर याचा मागील तीन महिन्यापासून परिश्रम घेवून नागपूर, रायपूर, राजनांदगाव, छत्तीसगड येथे शोध घेण्यात येत होता. परंतु सदर आरोपी हा मिळून येत नव्हता. तसेच मागील महिन्यात सदर आरोपी याने नागपूर ला दीड कोटी रुपयांची चोरी केली असल्याचे व त्यात सुध्दा तो नागपूर पोलीसांना पाहिजे असलेला आरोपी असल्याचे तसेच पो. ठाणे पाचपावली येथे दिनांक 25/06/2023 रोजी क्रेटा गाडी आणि नगदी रुपयाची चोरी करून तो पळून गेला असल्याची माहिती पो.नि.श्री.दिनेश लबडे, यांना प्राप्त झाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने पो. नि. लबडे यांनी वरिष्ठांना माहिती देवुन जिह्यातील सर्व ठाणेदार, यांना तसेच स्थानीक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सूचना केल्या होत्या.
सदर माहितीच्या
अनुषंगाने जिल्हा पोलीस पथक नमूद आरोपीचा शोध घेत असताना सपोनि श्री. पोपट टिळेकर, यांना माहिती मिळाली की नागपूरच्या गुन्ह्यातील चोरलेली क्रेटा गाडी कुडवा येथे दिसून आली आहे अश्या प्राप्त माहिती वरून सदर गाडी आणि आरोपीचा शोध घेत असताना क्रेटा गाडीतील आरोपीस पोलीस आपल्यामागे लागल्याची चाहूल लागताच क्रेटा गाडी सोडून पळून गेले पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून अत्यंत परिश्रमा नंतर मरारटोली, बसंत नगर परिसरातून अट्टल सराईत गुन्हेगार आरोपी नामे –
1) नरेश अंकालू महीलांगे वय 26 वर्षे राहणार दीप्ती सिग्नल पुजाराम वाडी, कळमना नागपूर
2) दीपक चंदू बघेले वय 22 वर्षे राहणार पिपरीया तालुका खैरागड जिल्हा राजनादगाव (छत्तीसगड)
अश्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या दोन्हीं गुन्हेगारांना पो. ठाणे देवरी, डूग्गीपार आणि नागपूर येथील दाखल गुन्हा संबंधात कसून चौकशी केली असता दोन्हीं गुन्हेगारांनी गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यांचे पासून पो. ठाणे देवरी जिल्हा गोंदिया गुन्ह्यातील नगदी 2 लाख रूपये आणि पो.ठाणे लकडगंज गुन्ह्यातील 1 लाख 25 हजार तसेच पो. ठाणे पाचपावली नागपूर गुन्ह्यातील क्रेटा गाडी किंमती 16 लाख रूपये असा एकूण नगदी 3 लाख 25 हजार रुपये आणि क्रेटा वाहन गुन्ह्याचे अनुषंगाने जप्त करण्यात आले.
आरोपी नरेश महीलांगे यास पो. ठाणे देवरी, पोलीसांचे आणि आरोपी दीपक चंदू बघेले यास पाचपावली नागपूर पोलीसांचे ताब्यात मुद्देमालासह स्वाधिन करण्यात आले आहे. पुढील तपास देवरी आणि पाचपावली पोलीस करीत आहेत.
यातील अट्टल गुन्हेगार आरोपी नामे- नरेश महीलांगे हा अत्यंत सराईत आरोपी असून त्याने महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा, गोंदिया, जिल्ह्यात अक्षरशः घरफोड्या करुन धुमाकूळ घालून आणि छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातील इतर जिल्ह्यात मोठ्या रकमेच्या घरफोड्या, चोऱ्या, मोटर सायकली, मोठी वाहने चोरी केल्या असून त्यावर साधारण 50 च्यावर गुन्ह्याची नोंद आहे.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. दिनेश लबडे, संदेश केंजले, सपोनि पोपट टिळेकर, विजय शिंदे, पोउपनि विघ्नें, पाटील, स फौ.कावळे, पो.हवा.मिश्रा, मेहर, देशमुख, कोडापे, हलमारे, लुटे, भेलावे, बिसेन, शेख, तुरकर, ठाकरे, पटले, पो.शि. केदार, रहांगडाले, भांडारकर, चापोशी गौतम, पांडे, यांनी तसेच पोलीस ठाणे रामनगर, रावणवाडी, गंगाझरी पोलीस पथकाने केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com