घरफोडी करणारया आरोपीस ठोकल्या बेड्या.. मानपाडा पोलिसांची धडक कारवाई …

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

डोंबिवली :- मानपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत घरफोडी चोरीच्या प्रकारा संदर्भात गुन्हे वाढल्याने नमुद गुन्हे उघडकीस आणण्याचे संबधाने मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, मा.श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण व मा. श्री. सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांनी विशेष मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्शन व सुचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे मानपाडा पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शेखर बागडे यांनी पोलीस ठाणेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करुन त्यांना वरीष्ठांनी दिलेले आदेश व सुचनांप्रमाणे मार्गदर्शन करुन सदरचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी सर्व अधिकारी व अमलदार यांनी अहोरात्र मेहनत घेवुन, संशयीत इसम नामे शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चेनाळे, वय २६ वर्षे, रा. ४ / १०, ओमसाई चाळ, गणपती मंदीराचे मागे, व्दारली गांव, ता. अंबरनाथ, जि.ठाणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने मानपाडा पोलीस
ठाणे, डोंबिवली पोलीस ठाणे व विष्णुनगर पोलीस ठाणेचे हद्दीत त्याचे साथीदारासह घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

सदर आरोपीत यास गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
गुन्हयात एकंदर २०० ग्रॅम वजनाचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण १२,००,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर कारवाईत मानपाडा पोलीस ठाणेचे खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. व यातील फरार आरोपींना अटक करुन आणखी मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत तपास चालू आहे.

१.मानपाडा पो.स्टे.
१४१ / २०२३
भादविक ४५४,३८०

२ .मानपाडा पो.स्टे.
१००३ / २०२२
भादविक ४५४,३८०

३.मानपाडा पो.स्टे.
१३० / २०२३
भादविक ४५४, ४५७, ३८०

४.मानपाडा पो.स्टे.
१०६ / २०२३
भादविक ४५४,३८०

५.मानपाडा पो.स्टे.
८२ / २०२३
भादविक ४५४, ४५७,३८०

६.मानपाडा पो.स्टे.
६५९ / २०२१
भादविक ४५४,४५७,३८०

७.डोंबिवली पो.स्टे.
०९ / २०२३
भादविक ४५४,३८०

८ .विष्णुनगर पो.स्टे.
४३ / २०२३
भादविक ४५४,३८०

९.विष्णुनगर पो.स्टे.
२४ / २०२३
भादविक ४५४,३८०

१०.विष्णुनगर पो.स्टे.
२६ / २०२३
भादविक ४५४, ४५७,३८०

सदरची कामगिरी श्री. दत्तात्रय शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, श्री. सचिन गुंजाळ, मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण व श्री. सुनिल कुराडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी, शेखर बागडे, सपोनिरी. अविनाश वनवे, सपोनिरी, सुनिल तारमळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोहवा / १०४२ / खिलारे, पोहवा / १४२६ / गडगे, पोहवा / ४८२ / ठिकेकर, पोहवा / ३१००/ पवार, पोहवा / ९४५ / पाटील, पोहवा / ६६७२ / माळी, पोहवा / १५४२ / मासाळ, पोना / २२७२ / भोईर, पोना / ४४१२/ किनरे, पोना / ७२८०/ पवार, पोना / ७३४२ / पाटील, पोशि/ ६९०६ / मंझा, पोशि/ ८२१५ / चौधर, पोशि/ ७६८३ / आहेर, पोशि/ ७३३१ / आव्हाड यांचे पथकाने केलेली आहे.

गुन्हयात एकंदर २०० ग्रॅम वजनाचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण १२,००,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर कारवाईत मानपाडा पोलीस ठाणेचे खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले

आहेत. व यातील फरार आरोपींना अटक करुन आणखी मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत तपास चालू आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट