घरफोडी करणारा सराईत आरोपीसह चोरीचे सोने घेणारा सोनार जेरबंद..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :– ७,५२,१००/- रु चा मुद्देमाल हस्तगत.

संजयनगर पोलीस ठाणे

गु. र. नं. ३४/२०२४ भादविस कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे

रणजितसिंग रामसिंग रजपुत, रा. रुम नं.०३, शितल प्लाझा अपार्टमेंट, बालाजीनगर, सांगली, माहिती कशी प्राप्त झाली

गु.घ.ता वेळ दि.१०.०३.२०२४ रोजीचे सायकाळी १६.३० वा ते १९:३० वाचे दरम्यान

गु.दा. ता. वेळ ता. ११.०३.२०२४ रोजी ००.०९ वा.

पोहेकॉ/६२६ बिरोबा नरळे

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा,सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, स्था. गु. अ. शा, पोहेकों / चिरोबा नरळे, संदिप गुरव, दरिचा चंडगर, संदिप नलावडे, उदयसिंह माळी,सागर लवटे, अमर नरळे, पोशि / कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे.

अटक वेळ दिनांक. २६/०३/२०२४ रोजी.

आरोपीचे नांव पत्ता

१) सुनिल नामदेव रुपनर, वय ३२ वर्षे, रा. कुपवाड, ता. मिरज जि. सांगली.

२) सुशील संजय आपटे, बय २४ वर्षे, रा. गारपीर चौक, सांगली.

उघडकीस आलेले गुन्हे

१. संजवनगर पोलीस ठाणे गु. र. नं. ३४/२०२४ भादविस कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे

२. संजयनगर पोलीस ठाणे गु. र. नं २८/२०२३ भादविस कलम ४५४, ३८० प्रमाणे

३. संजयनगर पोलीस ठाणे गु. र. नं.

४२/२०२४ भादयिस कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे

०९/२०२४ भादयिस कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे

४. सांगली शहर पोलीस ठाणे गु. र. नं. ४०९/२०२३ भाद‌विस कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे

१. जप्त मुद्देमाल ७,५०,१००/- रु. किंमतीचे १३४ ग्रॅम वजनाचे सोने त्यात वेढण, अंगठया बांगडया, बुगडी, रिंगा,टॉप्स, चैन, मणी मंगळसुत्र बोरमाळ, कर्णफुले, झुचे, असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने जु. वा. किं. अं.

२. २०००/- रु. किंमतीची त्यात ५०० दराच्या ३ व १०० रु. दराच्या ५ भारतीय चलनी नोटा. १००/- रु. किंमतीचा काळया रंगाचा लोखंडी धातुचा हातोडा जु. वा. किं. अं. ७,५२,१००/- (सात लाख बावण्ण हजार शंभर रुपये)


  1. गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक संदीप पुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने दि. २६/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोहेकों बिरोबा नरळे यांना त्यांचे चातमीदाराकडुन बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी सुनिल रूपनर हा सांगली रेल्वे स्टेशनचे पुर्वेस असले हरीप्रिया अपार्टमेंट समोरील रोडवर थांबला असून त्याचेकडे चोरीचे सोने असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, सांगली रेल्वे स्टेशनचे पुर्वेस असले हरीप्रिया अपार्टमेंटसमोरील रोडवरुन निगराणी करीत जात असताना, एक इसम संशयीतरित्या थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव सुनिल नामदेव रुपनर, चय ३२ वर्षे, रा. कुपवाड असे असलेचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास तिथे धांवण्याचे कारण विचारले असता समाधानकारक उत्तर न दिल्याने यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, सुनिल नामदेव रुपनर याचे कंबरेस लोखडी हातोडी अडकवलेली मिळून आली तसेच पॅन्टचे खिशात सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली. त्यास सोन्या चांदीच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सागितले की, सांगलीतील एसबीआय, अभयनगर, बालाजीनगर, होळकर चौक, विष्णुघाट तसेच सहारा चौक अशा विविध ठिकाणी बंद प्लॅटमध्ये घरफोडी करून चोरी केली होती. सदर साहित्य त्या ठिकाणी मिळालेले असून त्यातील काही सोने त्याचे ओळखीचे सुशील संजय आपटे रा. गारपीर चौक, सांगली यास विक्री करीता दिले असून राहिलेले सदरचे दागिने असल्याची कबूली दिली.

सुशील आपटे यास सुनिल रूपनर हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे तसेच तो चोरी करून सोने आणून देत असल्याचे माहित असताना देखील ते स्विकारले आहे. त्यास देखील पुढील तपास कामी ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी संजयनगर व सांगली शहर पोलीस ठाणेचे घरफोडी चोरीचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जातील सोन्याचे दागिने पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केले. सुनिल नामदेव रुपनर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून
त्याचेवर संजयनगर, विश्रामबाग आणि सांगली शहर पोलीस ठाणेस घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात
आला असुन पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट