हॉस्पिटल व गर्दीचे ठिकाणी चोरी करणारा सराईत आरोपी मोहम्मद सिद्दीकी यांस ६ तासात अटक करण्यात जे.जे. मार्ग पोलीसाना यश..

सह संपादक -रणजित मस्के
मुंबई :

➡️ पोलीस ठाणे:- सर जे जे मार्ग पोलीस ठाणे मुंबई
➡️ गुन्हा रजिस्टर क्रमांक व कलम :- 305/2025 , कलम 305(व) भारतीय न्याय संहिता 2023.
➡️ घटनास्थळ:- सर जे जे रुग्णालय , मुंबई
➡️ थोडक्यात हकीगत : –
वर नमूद तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी हे वार्ड क्रमांक 10 च्या बाहेर झोपलेले होते. फिर्यादी यांनी वर नमूद वर्णनाचा रियल मी कंपनीचा मोबाईल फोन झोपलेल्या ठिकाणी ठेवला होता. दुपारी 13.00 वाजताच्या सुमारास ते उठले असता त्यांना वर नमूद वर्णनाचा मोबाईल फोन मिळून आला नाही. सदर मोबाईल फोन त्यांनी परिसरात व आजूबाजूला शोध घेतला असता तो त्यांना मिळून आला नाही तरी कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या परवानगीशिवाय वर नमूद वर्णनाच्या मोबाईल फोन चोरी केला असावा म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वर नमूद कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
➡️ तपास सदर गुन्ह्याच्याअनुषंगाने मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सदर गुन्ह्याबाबत गांभीर्याने तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पो उप नि प्रशांत नेरकर व पथकास दिल्या.
सदर गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने पो उनि प्रशांत नेरकर व गुन्हे प्रकटीकरण पथक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना सदर परिसरातील खाजगी व सरकारी एकूण 30ते 40 सी सी टी व्ही केमेरे तपासून त्याचे आधारे सदर आरोपीत इसम हा मदनपुरा या ठिकाणी जात असल्याचे दिसून आले त्या परिसरात गुप्त बातमीदारामार्फत आरोपीचा विषयी माहिती घेतली असता सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मदनपुरा परिसरात असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर व पथकाने सापळा रचून मदानपुरा ठिकाणी नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपीच्या वर्णनाचा आरोपी दिसला असता त्यास पो उप नि प्रशांत नेरकर व पथकाने त्यांना हटकले असता ते पळून जाऊ लागल्याने त्यांना सिताफिने ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणून त्याच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी करून नमूद गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.
➡️ अटक आरोपी:- मोहम्मद सादिक शाकीर सिद्दिकी,
वय 43 वर्ष, धंदा नाही, राठी रूम नंबर 413, चौथा माळा, डी ब्लॉक,हरीमज्जित बाजूला, मदनपुरा, मुंबई 08.
➡️ चोरीस गेलेल्या मोबाईलचे वर्णन:-
1) रियल मी कंपनीचा सिल्वर रंगाचा मोबाईल फोन अंदाजे किंमत आठ हजार
2) रियल मी कंपनीचा मोरपंखी रंगाचा मोबाईल फोन अंदाजे किंमत सात हजार
➡️ हस्तगत मोबाईलचे वर्णन:-
) रियल मी कंपनीचा सिल्वर रंगाचा मोबाईल फोन अंदाजे किंमत आठ हजार
2) रियल मी कंपनीचा मोरपंखी रंगाचा मोबाईल फोन अंदाजे किंमत सात हजार
➡ *तपास पथक *
पो.उप.नि. प्रशांत नेरकर (DO)
पो ह तडवी, पो शि घाडगे, पो शि कोलपुसे,,पो शि शेवरे, पो शि डावरे,