दापोली हर्णै राज्य मार्गावर भीषण अपघात ८ जणांचा मृत्यू हर्णै येथील मॅजिक चालकाचाही मृत्यू…

उपसंपादक-राकेश देशमुख
दापोली : दापोली हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. ट्रक व मॅजिक प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला असून पाच जण दगावल्याचा अंदाज आहे. या भीषण अपघात एकूण 14 जणजखमी झाले होते. त्यातील ८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचे समजते.
या अपघातात हर्णै येथील प्रवासी मॅजिक चालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली असून प्रथमदर्शनी ट्रक चालकाच्याच चुकीमुळे ८ जणांना जीव गमवावे लागले आहेत. घटनास्थळी दापोली पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. या सगळ्याची नोंद करण्याची कार्यवाही दापोली पोलीसस्थानकात उशिरापर्यंत सुरू होती.

सगळ्या जखमी प्रवाशांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर काही प्रवाशांना पुढील उपचार करता पाठवण्यात आले आहे. दापोली तालुक्यात राज्यमार्गावर असलेल्या आसूद जोशी आळी येथे हा भीषण अपघात झाला. दुपारी 3.30 सुमारास अपघात झाला.
या अपघातामध्ये आठजण जण मृत्यूमुखी पडले आहेत यामध्ये दोन मुलींसह दोन अन्यजणांचा सामावेश आहे. पाच जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. तर काही जखमीना मुबंईत हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

या दुर्दैवी भीषण अपघातात पुढील ८ जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे.
मरियम गौफिक काझी-6, स्वरा संदेश कदम-8,संदेश कदम-55 ,फराह तौफिक काझी-27 सर्व राहणार अडखळ, अनिल उर्फ बॉबी सारंग45 हर्णै अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

तसेच अपघातातील जखमी मध्ये पुढील जणांचा समावेश आहे
विनायक हशा चौगुले-45 पाजपंढरी,श्रध्दा संदेश कदम-14 अडखळ, मिरा महेश बोरकर-22 पाडले,सपना संदेश कदम-34 अडखळ,भुमी सावंत-17 हर्णे (मुंबई ट्रान्सफर), मुग्धा सावंत-14 हर्णे (मुंबई ट्रान्सफर), वंदना चोगले-38 पाजपंढरी, ज्योती चोगले-09पाजपंढरी, विनोद चोगले-30 पाजपंढरी, या संपूर्ण अपघाताचा तपास दापोली पोलीस करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com