शैक्षणिक चळवळीचे सन्मा. श्री. सत्यवान रेडकर यांचा सुरक्षा पोलीस टाइम्स या वृत्तवाहिनी तर्फे विशेष सत्कार…!

प्रतिनिधी-मंगेश हुमणे
मुंबई :शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी मुंबईतील बोरीवलीत सुरक्षा पोलीस टाइम्स वृत्तवाहिनीच्या बोरिवली येथील कार्यालयात मुख्य संपादिका श्रीमती दिप्तीताई दिपक भोगल, संपादिका यांच्या शुभहस्ते, कोकणचे भूमिपुत्र, तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे संस्थापक, श्री सत्यवान यशवंत रेडकर, अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांना राजा शिवछत्रपती पुरस्कार स्वरूपात पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे गाव व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे योगदान पाहता स्वेच्छेने सुरक्षा पोलीस टाइम्स या वृत्तवाहिनीमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरक्षा पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी श्री. मंगेश हुमणे, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश दाभोलकर हे देखील उपस्थित होते.
