माननीय प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय-आमगाव, यांनी नायलॉन मांजा वापरण्यावर केला दंड व कारावासाची शिक्षा..

उपसंपादक – रणजित मस्के
गोंदिया :-नायलॉन मांजा विक्री करीता बाळगल्या प्रकरणी पोलीस ठाणे आमगाव दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे- दशरथ सीताराम डेकाटे रा. आमगाव यास 450/- रुपये आर्थिक दंडाची, तर दंड न भरल्यास 11 दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे…
▶️ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, घटना दिनांक 11.01.2024 रोजी साधारण 19:45 ते 20:40 वाजता दरम्यान मौजा- तुकडोजी चौक, आमगाव, ता. आमगाव, जि. गोंदिया येथे यातील आरोपी नामे- दशरथ सीताराम डेकाटे रा. आमगाव याने पर्यावरणास आणि इतरांच्या जीविताला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका आहे असे माहीत असुन सुद्धा नायलॉन मांजा बाळगून मांजा विक्री करतांना मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध पो. ठाणे आमगाव येथे अपराध क्र. 11/2024 कलम 290,336 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते….. सदर गुन्ह्याचे तपास करून गुन्ह्यात आरोपी विरुद्ध दोषारोप सादर करण्यात आले..
मा. न्यायालयात सदर प्रकरणाचे केस क्र. 228/2024 ची बाजू पडताळण्यात आली असता न्यायालया समक्ष यातील आरोपीने नायलॉन मांजा बाळगून विकून उपद्रव केला असल्याचे आणि त्याद्वारे भारतीय दंड संहितेच्या कलम 290 नुसार दंडनीय गुन्हा केलयाचे तसेच इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याने I.P.C च्या कलम 336 नुसार दंडनीय गुन्हा केल्याचे दोषसिद्ध. झाल्याने मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय आमगाव यांनी सदर प्रकरणाचा न्यायनिवाडा करत आरोपी नामे- दशरथ सिताराम डेकाटे रा.आमंगाव यास नायलॉन मांजा जवळ बाळगल्याबद्दल सीआरपीसी कलम 252 प्रमाने 450/-रु दंड, आणि दंड न भरल्यास 11 दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com