माननीय प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय-3 रे, गोंदिया, यांचा विनयभंगाच्या गुन्ह्यांत प्रथमच एकास 3 वर्षे सक्त कारावासाची आणि 5 हजार रुपये दंडाची तर दुसऱ्यास 1 वर्षाची व 1000/- रूपये दंडाची अशी दोघांना ठोठावली शिक्षा…

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

गोंदिया :– ▶️ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, घटना दिनांक 25/08/2016 रोजी मौजा- मुरदोली येथील रहिवासी आरोपी नामे – 1) मनिष कुवरलाल इलपाते वय 23 वर्ष 2) राजकुमार देवराम टेकाम वय 18 ,रा- दोन्ही मुरदोली ता. गोरेगाव, जि- गोंदिया यांनी महिलेचा विनयभंग केल्याने महिला फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे गोरेगाव येथे अपराध क्रमांक- 56/2026 कलम 448, 354, 34 भा.दं.वि. अन्वये दाखल करण्यात येवून तपास करण्यात आले……तपासादरम्यान गुन्ह्यांत नमूद दोन्ही अरोपितांना अटक करण्यात आली…. मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तपासा दरम्यान अरोपीतांविरूध्द भक्कम सबळ साक्ष पुरावे गोळा करून तपासाअंती मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, न्यायालय, गोंदिया येथे गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायास्तव सादर करण्यात आले…….. मा. न्यायालय 3 रे, जे. एम. एफ. सी. गोंदिया यांचे न्यायालयात गुन्ह्याचे केस. क्र. 393/2016 अन्वये खटला चालविण्यात आला….

मा. न्यायालयात सदर खटल्याचे युक्तिवाद, सुनावणीत भक्कम सबळ साक्ष पुरावे वरून आरोपीताविरूध्द दोषसिद्ध झाल्याने . मा. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी, न्यायालय 3 रे, गोंदिया यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपी यांना भा.द.वी. कलम 448, 354, 34, मध्ये दोषी धरून आरोपी क्र 1 मनिष इलपाते ला 3 वर्ष सक्त कारावासाची व 5000/- rs दंडाची शिक्षा सुनावली, तसेच आरोपी क्रं 2 राजकुमार टेकाम ला 1 वर्ष सक्त कारावास व 1000/- rs दंड, दंड न भरल्यास 1 महिना सक्त कारावास ची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

मा. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सदर गुन्ह्याचा भक्कम युक्तिवाद सरकारी वकील- प्रणिता संतोष कुलकर्णी यांनी केले असून सदर गुन्ह्याचे उत्कृष्ट तपास तपासी अधिकारी- खुशाल भस्मे* यांनी केले आहे… मा.न्यायालयात गुन्ह्याचे अनुषंगाने पैरवी कामकाज म्हणुन सीएमएस सेल चे प्रभारी अधिकारी- मोटे , पोलीस निरिक्षक* यांनी कामकाज पाहिले…

पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. नित्यानंद झा, यांनी सदर गुन्ह्याचे उत्कृष्ट तपास करणारे तपासी अधिकारी, सरकार पक्षातर्फे मा. न्यायालयात भक्कम बाजु मांडणारे सरकारी वकील, न्यायालयात गुन्ह्याचे अनुषंगाने पैरवी कामकाज पाहणारे सर्वांचे अभिनंदन, कौतुक केले आहे..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट