घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एलसीडी टीव्ही सह अटक, स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कामगिरी..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी श्री. राजेश गणेश भिमकर, वय 54 वर्षे, रा.राजाभोज कॉलोनी रिंगरोड, गोंदिया,  व्यवसाय- नौकरी, रेल्वे स्टेशन मास्टर, हे दुर्ग छत्तीसगढ येथे सासुरवाडी ला दि. 29/05/2023 रोजी दुपारी 14.30 वा. गेले होते व दि.11/06/ 2023 रोजी दुपारी 12.30 वा. घरी परत आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचे समोरील दाराचा कुलूप तोडुन शो-केस मधील एलसीडी टी.व्ही. सोनी कंपनीची 49 इंची ची किंमत 62,000/- रु ची चोरून नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो.स्टे. रामनगर येथे गु.र.न.155/ 2023 कलम 454, 457, 380, भादवी अन्वये अज्ञात चोरट्या विरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

     मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांनी सदर घरफोडी गुन्ह्यांचे अनुषंगाने सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना तसेच ठाणेदार रामनगर तसेच स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्यातील अज्ञात चोरट्या चा शोध घेऊन तात्काळ गुन्हा उघड करण्याच्या सूचना देऊन निर्देश दिले होते. 

    मा. वरिष्ठांचे निर्देशांप्रमाणे व मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा पथक चोरी, घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध करीत असताना पथकास गोपनीय बातमीदार कडून माहिती मिळाली की,ईसंम नामे - विकास ऊर्फ कालू बुराडे रा.विजयनगर,कटंगी कला याने काही दिवसा पूर्वी मोठी टी.व्ही.चोरी केली असून विक्री करणार आहे. अश्या प्राप्त खात्री शिर माहितीच्या आधारे घरफोडी करणारा गुन्हेगार नामे - विकास उर्फ कालू बळीराम बुराडे वय 25 वर्षे रा. विजयनगर, कटंगी कला गोंदिया यास त्याचे राहते पत्त्यावरून ताब्यात  घेण्यात आले.  पो.स्टे. रामनगर दाखल अप. क्र.155/2023 मधील एलसीडी टीव्ही चोरी बाबत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्यांतील चोरीस गेलेली एलसीडी टीव्ही चोरी केल्याचे कबूल केले. त्यांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरी केलेली सोनी कंपनीची एल.सी.डी. टि.व्ही.49 इंच किं.62,000/- रुपयाची गुन्ह्यात हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीस पो.स्टे. रामनगर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत असून आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचे पासून रामनगर परिसरा तील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

        सदरची कामगिरी मा.वरिष्ठांचे निर्देशांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात स.फौ. अर्जुन कावळे, पो.हवा. राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, संतोष केदार यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट