पोलीस खात्यांतर्गत पोलीस निरीक्षक पदाच्या भरतीची वयोमर्यादा वाढवण्याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांस निवेदन सादर…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:- दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी सन्मानीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री महाराष्ट्र राज्य यांना सागर बंगल्यावर भेटून खात्या अंतर्गत पोलीस निरीक्षक पदाच्या भरतीसाठी वयोमर्यादा वाढवावी यासाठी एक निवेदन देण्यात आले.

यामुळे महाराष्ट्रातील अनेक पोलीस कर्मचारी यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होईल ,जालना येथील पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्ती बाबत ,पोलीस पाल्यांना पोलीस भरतीत आरक्षण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांना राज्यात मोफत आरोग्य सुविधा भेटावी,होमगार्ड यांच्या मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप चालू करावी,होमगार्ड यांना मोफत मेडिकल सुविधा द्यावा त्यांना 365 दिवस नोकरी मिळावी अशा अनेक विषयांवर देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा झाली.

प्रत्येक पोलिसाच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे राहुल काळजी करू नकोस, महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांच्या परिवाराचा प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे शब्द आज मा. गृहमंत्री देवेंद्र फडवणीस साहेबांचे होते .

पोलीसांप्रती आत्मीयता व पोलिसांप्रती प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असणारा गृहमंत्री मी आज पाहिला. मी मांडलेल्या प्रत्येक अडचणीला सोडवण्याचा शब्द मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज त्यांच्या सागर बंगल्यावर दिला. त्यामुळे मी महाराष्ट्रातील तमाम पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून त्यांचा शतशः ऋणी राहील असे मत यावेळी श्री राहुल अर्जुनराव दुबाले
संस्थापक/अध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य यांनी काढले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट