गृहरक्षक दलाच्या जवानाला २५ लाखांचा धनादेश..
उपसंपादक-रणजित मस्के
अलिबाग : कर्तव्य बजावत असताना अपघातात जखमी झालेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाला कायमचे अपंगत्व आले होते. या जवानाला विमा योजने अंतर्गत २५ लाख रुपयांचा धनादेश सोमवारी वितरित करण्यात आला. लक्ष्मण विठ्ठल आखाडे हे रायगड जिल्ह्यातील गृहरक्षक दलात जवान म्हणून कार्यरत आहेत. ते दिनांक ५/९/२०२२ रोजी आला. गणेशोत्सव बंदोबस्ताकरिता खालापूर पोलीस ठाणे येथे रात्रपाळीसाठी दरोडा प्रतिबंधक पथकात नियुक्तीवर होते. या ठिकाणी कर्तव्यावर असताना पहाटे ०१:३० वाजता त्यांना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात आखाडे कायमस्वरुपी अपंगत्व आले होते.


दरम्यान राज्याचे गृहरक्षक दलाचे महासमादेशक यांनी महाराष्ट्र राज्यातील होमगार्डना विम्याचे संरक्षण प्राप्त व्हावे, यासाठी राज्यातील चाळीस हजार होमगार्ड यांचे एच. डी. एफ. सी. बँकेत खाते उघडून सर्वाना विमा संरक्षण मिळवून दिले आहे. या विमा योजने अंतर्गत म्हणून आखाडे यांना अपंगत्व विमा संरक्षण योजने अंतर्गत २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात यावेळी राज्य गृहरक्षत दलाचे महासमादेशक भूषण कुमार उपाध्याय, उपमहासमादेशक ब्रिजेश सिंह, जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, एचडीएफसी बँकेचे वाईस प्रेसिडेंट कॉर्पोरेट सॅलरी यांना तसेच क्लेम सेटलमेंट मॅनेजर मंजिरी सामंत उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com