कोकणात ,गोव्याला व मेंगलोर ला जाण्यासाठी पालघर येथे हॉलिडे स्पेशल थांबणार :- केदार काळे

0
Spread the love

प्रतिनिधी- महेश वैद्य

पालघर : दिनांक 8 एप्रिल 2023 कोकणात -गोव्याला व मंगलोरला जाण्यासाठी व येण्यासाठी उधानां मेंगलोर हॉलिडे स्पेशल 09057 UP /09058 DN. गाडीचा थांबा पालघर येथे मिळाला आहे .
गाडी दर बुधवारी रात्री 10. 12 वाजता पालघर येथे येऊन मेंगलोर ला जाणार आहे.


ह्या गाडीमुळे कोकणात जाणाऱ्या ,गोव्याला जाणाऱ्या व मंगलोर उडपी येथे जाणाऱ्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्यंत सोयीची होणार आहे.
ही गाडी रोहा- चिपळूण- संगमेश्वर/ राजापूर- कणकवली- सावंतवाडी/ मडगाव -कारवार- उडपी व मेंगलोर ह्या रूटवर जाणार असल्याने सुट्टीत आपल्या गावाला जाणाऱ्या कोकणातील नागरिकांना त्याचा खूप उपयोग होणार आहे.

तसेच सुट्टी घालवण्यासाठी गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा उपयोग होणार आहे. मेंगलोर उडपी कारवार येथे जाणाऱ्या प्रवाशांना गाडी चांगली सेवा देणार आहे.
ही गाडी हॉलिडे स्पेशल असल्यामुळे मेंगलोर कडे जाताना 12 एप्रिल 2023 ते 7 जून 2023 या कालावधीत दर बुधवारी रात्री 10.12 पालघर येथे थांबणार आहे.
तसेच मेंगलोरून उधवा येथे येण्यासाठी ही गाडी दर शुक्रवारी 14 एप्रिल 2023 ते 9 जून 2023 ह्या कालावधीमध्ये दर शुक्रवारी संध्याकाळी 5 .52 येणार आहे.
ह्या गाडीचा थांबा पालघर येथे दिल्याबद्दल बाबत डी आर यु सी सी सदस्य केदार काळे यांनी आनंद व्यक्त केला आहे व रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव साहेब रेल्वे राज्यमंत्री खासदार श्री राजेंद्र गावित साहेब पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वेचे जनरल मॅनेजर डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांना धन्यवाद दिले आहे प्रवाशांनी या गाडीचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे आवाहान केदार काळे यांनी केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट