होळी सणासाठी क्रुझर गाडीमध्ये विनापरवाना देशी दारुची चोरटी वाहतुक करणारा जालना पोलीसांच्या ताब्यात..

सह संपादक-रणजित मस्के
जालना
याचे ताब्यातुन 6,61,280 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाही
जालना जिल्हयात अवैध धंदयावर कार्यवाही करणे बाबत मा. पोलीस अधिक्षक श्री अजयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या.
त्यावरुन श्री.पंकज जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी एक पथक तयार करुन अवैध धंदयावर कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने जालना शहरात पेट्रोलिंग करीत असतांना पचकास गुप्तमाहिती मिळाली होती की, ईसम नामे शेख लतीफ शेख कासीम वय 50 वर्ष रा. तड्डुपुरा, जुना जालना हा त्याचे कुझर गाडी क्र. MH 21 AX 0964 यामध्ये देशी दारु भिंगरी संत्रा लेबल असलेल्या 180 MI च्या 48 बॉक्स, एका बॉक्स मध्ये 48 वाटल्या असे एकुण 2304 सिलबंद बाटल्या किंमती 6,61,280-00 रु च्या ईसम नामे शेख ईरफान उर्फ बबलू शेख उस्मान रा. घनसावंगी जि.जालना याचे सांगणे वरुन होळी सणा निमित्त चोरटी विक्री करुन वाहतुक करीत असतांना मिळून आला. असुन नमुद आरोपी विरुध्द पोलीस ठाणे तालुका जालना, येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, श्री. अनंत कुलकर्णी उप विभागीय पोलीस अधिकारी जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, श्री.योगेश उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र बाघ, पोलीस उप निरीक्षक, व पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, ईशांद पटेल, सतीष श्रीवास, रमेश काळे, सर्व ने.स्थागुशा जालना यांनी केली आहे.