हायवेला कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी हिंजवडी पोलीसांचे जाळयात, ६ गुन्हे उघड…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे – हिंजवडी

हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाची कामगीरी फिर्यादी यश नागेश मळगे वय ३० व्यवसाय गवंडीकाम, रा. के ऑफ शशिकांत सुतार चाळ पोस्ट ऑफीसचे समोर कोथरूड पुणे हा दिनांक दि. ०१/०४/२०२३ रोजी रात्री २३/३० वा. चे सुमारास चांदणी चौकाचे अलीकडे असणारे काचेच्या बिल्डींग शेजारील सव्र्हस रोडवर बावधन पुणे येथे फोनवर बोलत असताना अज्ञात आरोपीत यांनी जबरदस्तीने फिर्यादी यांचे खिशामध्ये हात घालून पैशाचे पाकीट काढुन मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करुन फिर्यादी यांनी त्यास प्रतिकार केला असता त्यांचेकडील लोखंडी कोयता डाव्या हातावर मारुन फिर्यादी यांना जखमी करुन त्यांचेकडील हिरो होन्डा कंपनीची स्प्लेंडर मो. सायकल ही संमतीशिवाय बळजबरीने चोरुन घेवून गेले म्हणुन हिंजवडी पोलीस गुरनं ४३० / २०२२, भादवि कलम ३९४ ३४ आर्म अॅक्ट ४ २५ सह मुपोका ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सो. यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.

सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान तपास पथकातील अंमलदार यांनी सतत दहा दिवस चांदणी चौक, बावधन ते लवासा, पौड, खडकवासला या भागातील जवळपास ६५ सीसीटीव्ही फुटेज तपासले असता खडकवासला परिसरातील रेकॉर्डवरील आरोपी रामदास बबन कचरे याचेशी मिळते जुळते वर्णनाचे फुटेज असल्याचे समजले, त्याप्रमाणे आरोपीची माहिती घेवुन त्याचे तांत्रीक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढली असता सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी रामदास बबन कचरे व त्याचे २ साथीदार यांनी मिळुन केला आहे. अशी माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे आरोपी रामदास बबन कचरे व साथीदार यांचा शोध घेण्यासाठी सिंहगड पायथा, लवासा परिसर, मुठा गाव, ताम्हीणी घाट या परिसरात वेशांतर करुन सापळा रचला परंतु आरोपी हे पोलीसांची चाहुल लागताच पळुन जात होते. आरोपींचा शोध घेत असताना सहा. पो. फौजदार बंडु मारणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, आरोपी रामदास बबन कचरे हा बापूजी बुवा मंदीर माण ता. मुळशी जि. पुणे येथे मंदीर परिसरात त्याच्या दोन साथीदारांसह बसलेला आहे. त्याप्रमाणे तेथे जावून खात्री केली असता वरील तिनही आरोपी पोलीसांना पाहुन पळुन जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलीस स्टाफने शिताफीने पकडले व खात्री केली असता त्यात आरोपी

१) रामदास बबन कचरे वय २२ वर्षे, रा. सोलमलोन ता. महाड जि रायगड हल्ली रा. डोनजे गांव ता. हवेली जि. पुणे व

२ विधीसंघर्षीत बालक असल्याची खात्री झाली. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ४३०/२०२३ भा.द.वि.क ३९४, ३४ आर्म अॅक्ट ४ २५ सह मुमोका ३७ (१) (३) हा गुन्हा केल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी रामदास
असता त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून जबरी चोरीचे खालील गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

१. हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ४३० / २०२३ भा.द.वि.क. ३९४, ३४ सह आर्म अॅक्ट ४,२५

२. हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १७९/ २०२३ भा.द.वि.क. ३९२, ३४

३. हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं १६१/२०२३ भा.द.वि.क. ३७९

४. पौड पोलीस ठाणे गु.र.नं. १३९ / २०२३ भा.द.वि.क. ३९४, ५०४, ५०६, ३४

५. पौड पोलीस ठाणे गु.र.नं. १४८/२०२३ भा.द.वि.क. ३९२, ३४ ६. हवेली पोलीस ठाणे गु.र.नं. ११३ / २०२३ भा.द.वि.क. ३९४, ३४

त्यानंतर आरोपी याचेकडुन गुन्हयात चोरलेल्या मोटरसायकल, सोन्याची चैन, चोरलेले मोबाईल व वापरलेले हत्यार असा खालीलप्रमाणे मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

१) हिरो होन्डा स्प्लेंडर मोटरसायकल नंबर एम.एच.१२. एल. सी. ७३४५

२) अॅक्टीवा सफेद रंगाची तिचा क्रमांक एम.एच. १२. एस. जे. ५६३९

३) शाईन मोटरसायकल क्रमांक एम. एच. १२ आर. एल. २०३४

४) अॅक्टीवा गाडी क्रमांक ओ. पी. ०९ सी.जे. ८५४२

५) लोखंडी कोयता मुठ ५.५ सेमी लांबीची पाते १०.६ सेमी लांब व २.५ सेमी रुंद असलेला

६) २०००/- रु रोख

७) एक सोन्याची चैन वजन ३ ग्रॅम ३०० मिली वजनाची ८) क्रिम कलरची सॅक त्यावर नॅचरल हेम्प असे लिहीलेले आहे

९) पोको कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल (१०) रेड मी कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल असा एकूण १,१८,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा.श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. संजय शिंदे सो, पोलीस सह आयुक्त, मा. श्री वसंत परदेशी सो, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परि. २. पिंपरी चिंचवड, मा. स्वप्ना गोरे पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, अतिरिक्त प्रभार पोलीस उप आयुक्त परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पि चि यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास गले, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कावळे, सुभाष गुरव, नरेश बलसाने, सागर पंडीत यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट