हिंजवडी गुन्हे पोलीस पथक यांनी मौजमजेसाठी जबरी चोरी करुन मोबाईल व चैन चोरणारा आरोपीस केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :-फिर्यादी नामे कोमल संतोष निकाळजे वय २२ वर्षे धंदा. घरकाम रा. बोडकेवाड़ी माण ता. मुळशी जि. पुणे ही दि.२४/०१/२०२४ रोजी दुपारी १/१० वा. चे सुमारास पांडवनगर हिंजवडी येथून पायी जात असताना तीन अज्ञात इसमांनी अॅक्टीव्हा मोपेड गाडीवरुन येवून तिच्या गळयातील मंगळसुत्र व हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले म्हणून हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ७९/२०२४ मा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान ३५ सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचे तांत्रीक विश्लेषण करून संशयीत आरोपीचा व मोपेड गाडीचा शोध घेत असताना सपोनि राम गोमारे यांना बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक ०५/०२/२०२४ रोजी राम गोमारे सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस स्टाफने भूमकर चौक येथे सापळा रचुन शिताफीने आरोपी लोकेश दयानंद कांबळे वय १८ वर्षे ४ महिने रा. अष्टविनायक चौक किराणा दुकानाशेजारी मोरे वस्ती साने चौक चिखली पुणे यास ताब्यात घेवून त्याच्याकडून वर नमुद गुन्हयातील बोरीस गेलेला मोबाईल जप्त करून त्याचेकडे विचारपुस करता त्याचे साथीदार नामे १) कृष्णा धायींजे रा. रहाटणी २) विधीसंघर्षीत बालक यांचेसह दाखल गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेने त्यास दि. ०५/०२/२०२४ रोजी २३/३३ वा. अटक करून कौशल्याने तपास करता त्यांनी दाखल गुन्ह्यातील मोबाईल सोन्याचे मंगळसुत्र व पुढील तपासात त्यांनी १) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ९२४/२०२२, भादवि कलम ३९२ (२) हिजवडी पोलीस ठाणे गु.२.नं. १६३/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ हे गुन्हे केल्याचे निष्पन्न होवून त्यातील दोन मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे.
अशा प्रकारे अटक आरोपीकडुन एकुण ३ मोबाईल व एक मंगळसुत्र असे एकुण ५९,२००/- रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत करून तसेच ३ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगीरी केली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार पौने सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीराम पौळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, सराटे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com