पिस्टलाचा धाक दाखवुन लुटमार करणारे हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :-मा. पोलीस आयुक्त सो. पिंपरी चिंचवड यांनी अवैध रित्या अग्नीशस्त्र किंवा घातक हत्यारे जवळ बाळगणा-या इसमांची माहिती घेवुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असताना दिनांक २५/०५/२०२४ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, कन्हैया थोरात यांचे सुचनांप्रमाणे हिंजवडी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे राम गोमारे सहा पोलीस निरीक्षक व तपास पथकतील अंमलदार सहा. पोलीस उपनिरीक्षक नरेश बलसाने, पोलीस हवालदार १५७६ नरळे, पोलीस नाईक १९०१ चव्हाण, पोलीस नाईक १७४८ गडदे, पोलीस शिपाई २४०१ कांबळे, पोलीस शिपाई २४०० शिंदे व पोलीस शिपाई २२८४ पालये असे दोन वेगवेगळया टिम तयार करुन हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत अवैध चंदयांवर व अवैध अग्निशस्त्र व घातक हत्यार जवळ बाळगारे इसमांवर कारवाई करण्याचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना तपास पथकाचे प्रभारी राम गोमारे सहा. पोलीस निरीक्षक यांना माण फेज ३ हिंजवडी पुणे येथे व सहा. पोलीस उपनिरीक्षक नरेश बलसाने यांना सुस ब्रीजखाली सुस पुणे येथे वेगवेगळे दोन इसम गावठी कटटे घेवुन येणार असलेबाबत गुप्त बातम्या मिळाल्याने दोन वेगवेगळ्या टिमने गाण फेज ३ हिंजवडी पुणे व सुस बीज खाली सुस पुणे येथे सापळा लावुन दोन इसमांना ताब्यात घेतले.

त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता अजय शंकर राठोड वय २१ वर्षे, रा. ऐअर रोड चंडा नाईक तांडा, पाषाण वीट मटटी जवळ विजय तिम्हण यांची चाळ पाषाण पुणे व जिशान जहीर खान, वय २३, रा. वॉर्ड नं. ३. दापोडी, पुणे मुळ गाव रा. रसल पुर, मुजफ्फर, ता. नगीना, जि. बिजनोर, उत्तरप्रदेश असे असल्याचे सांगितले असता इसम नामे अजय शंकर राठोड याचे ताब्यात ५१,०००/- रुपये देशी बनावटीचे रिव्हॉलव्हर, दोन जिवंत काडतुस व एक होंडा शाईन असे मिळून आहे वइसम नामे जिशान जहीर खान याचे ताब्यात ८७,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी कटटा, चार काडतुस व मेपोडे अॅक्टीव्हा मोटार सायकल मिळून आली आहे. इसम नामे अजय शंकर राठोड व जिशान जहीर खान हे एकमेकांचे मित्र असुन त्यांनी वरील दोन्ही मोटार सायकल ह्या बावधन व सुस येथे चोरी केल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अजय शंकर राठोड व जिशान जहीर खान यांना अटक करुन त्यांचाकडे पोलीस कोठडी रिमांडमध्ये असताना कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांनी सुस बीज जवळील डोंगरावर पाषाण पुणे येथे त्यांचे इतर तीन साथीदारांसह मिळुन गावठी रिव्हॉलव्हरचा धाक दाखवुन त्याचे अपहरण करुन त्यांचेकडुन त्याचे गळयातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढुन घेतली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यांचेकडुन एकुण ३५,०००/- रुपये किंमतीची एक ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगस्त करण्यात केली असुन त्याबाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गु.र.नं.४६९/२०२४ भा.द.वि. कलम ३९७, ३६४(अ), आर्म अॅक्ट ३. २५ सह मुपोका ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

आरोपी यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केले असल्याचे उघड झाले आहे.

१) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं.६४२/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

२) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं.६६१/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे

३) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ६७७/२०२४ आर्म अॅक्ट ३, २५ सह मुपोका ३७ (१) (३) १३५ प्रमाणे

४) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ६८०/२०२४ आर्म अॅक्ट ३. २५ सह मुपोका ३७ (१) (३) १३५ प्रमाणे

५) चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गु.र.नं.४६९/२०२४ भा.द.वि. कलम ३९७, ३६४(अ), आर्म अॅक्ट ३. २५ सह मुपोका ३७ (१) (३) १३५ प्रमाणे

६) चतुश्रृंगी पोलीस ठाणे गु.र.नं.२६५/२०२४ भा.द.वि.क. ३२४.३४ प्रमाणे

सदरची कारवाई मा.श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी सो, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर, पोलीस उप आयुक्त परि. २. पिंपरी चिंचवड, मा. श्री.डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास कॅगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट