गोंदिया पोलिस दादालोरा खिड़की योजनेच्या माध्यमातून “एक हात मदतीचा”

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-

         मा. निखिल पिंगळे, (IPS) पोलिस अधीक्षक, गोंदिया, यांच्या संकल्पनेतून व मा. श्री. अशोक बनकर, अप्पर पोलीस अधीक्षक, (कॅम्प) देवरी, श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, यांचे मार्गदर्शनाखाली , "पोलिस दादालोरा खिड़की" योजनेच्या माध्यमातून ' एक हात मदतीचा' योजने अंतर्गत दि-06/07/2023 रोजी-  पोलिस स्टेशन चिचगड अंतर्गत AOP पिपरखारी येथे नक्षलग्रस्त आदिवासी भागातील मौजा- (बिचटोला) येथील पुरुष व महिला शेतकरी यांना मा.पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांच्या हस्ते (धान बीजाई ) पेरणी च्या अनुशंगाने वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांनी या भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक  पारंपारिक शेती सोबत आधुनिक शेतीला प्राधान्य द्यावे व शासनाच्या कृषी विषयक विविध योजना या पोलिस विभाग " पोलिस दादालोरा खिडकी" च्या माध्यमातून आपल्या दारी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतील, आणि सदैव प्रयत्नशील आहेत असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नवनिर्मित सशस्त्र दुरक्षेत्र "पिपरखारी" येथे पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येवून अनेक प्रकारचे वृक्ष लावण्यात आलेत.

      यावेळी 'बीचटोला' पिपरखारी येथील ग्रामस्थ, शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

       सदर कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांचे सह, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर,  पोलीस स्टेशन चिचगड चे प्रभारी शरद पाटील, AOP पिपरखारी प्रभारी जानकार, पोलीस उपनिरीक्षक मटामी, पोलीस स्टाफ तसेच परिसरातील शेतकरी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट