हेल्थ क्लब च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बार्शी :-येथील फ्रेंड्स बहुद्देशीय संस्था संचालित हेल्थ क्लब च्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम बार्शी टेक्सटाईल मिलच्या पॅवेलीयन मैदानावर पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाली. यावेळी उपस्थितांपैकी रवींद्र कदम, सुमित खुरंगुळे, भगवान लोकरे व संभाजी नवले यांनी मनोगत व्यक्त केले.

संभाजी नवले यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाजसुधारणेसाठीही अनेक कामे केली. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. पण, ते आपल्या सर्वांसाठीच नाही तर अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत, त्यातून सर्वांनी प्रेरणा घेऊन जीवन जगल्यासच खऱ्या अर्थाने ती बाबासाहेबांना मानवंदना ठरेल.

भगवान लोकरे यांनी मनोगत व्यक्त करताना, “डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते”, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमास भगवान लोकरे, संभाजी नवले दीपक धावारे राहुल कांबळे, सागर सोत्रे, सुमित खुरंगुळे, गोविंदा भिसे, विशाल मोरे यांचेसह हेल्थ क्लब, भगवंत क्रिकेट क्लब, मोरया क्रिकेट क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट