सांगलीत पोलीस व परिवारातील कुटुंबीयांचे सर्व रोग आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली ;
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे व जिल्हा शल्य चिकत्सिक डॉ विक्रमसिंह कदम पांच्या संकल्पनेतून च मार्गदर्शनाखाली दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपाधीक्षक गृह, पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांचे नियोजनामध्ये पोलीस कल्याण अंतर्गत सांगली जिल्हा पोलीस घटकातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार त्यांचे कुटुंबीय, पोलीस अधीक्षक कार्यालयीन लिपीक वर्ग यांचेकरीता दि. ०८/०१/२०२५ रोजी सकाळी ०९.०० ने १४.०० वा पर्यंत कृष्णा मॅरेज हॉल, पोलीस मुख्यालय, सांगली येथे सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिर आयोजीत करण्यात आले होते.



सदर आरोग्य शिबीरामध्ये
ई.सी.जी.
फास्टींग इन्शुलीन, HBAIC
नेत्रतपासणी
बालरोग तपासणी
फिजिओथेरपी याबाबत उपचार व मार्गदर्शन करणेत आले.
रक्ताचे नमुने घेवुन त्यामध्ये सी.बी.सी. लीपीड प्रोफाईल, युरीक अॅसिड याबाबत तपासणी करणेत आली.
आयुष तज्ञांमार्फत आयुर्वेदीक व होमिओपॅथिक उपचारांचे मार्गदर्शन करणेत आले.
सदर तपासणी करीता सांगली जिल्हा पोलीस घटकातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस अधीक्षक कार्यालयीन लिपीक वर्ग च पोलीस कुटुंबीय असे एकूण ३१९ लाभार्थीणी सहभाग घेतला, सदर शिबीरामध्ये वैदयकिय अधिकारी यांनी लाभार्थीची तपासणी करुन उत्तम आरोग्याचाचत मार्गदर्शन केले व ई.सी. जी तपासणी नंतर ४४ लाभार्थींची इको तपासणी मोफत करणेत येणार आहे. त्यामध्ये शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेस शाजिया पूर्णपणे मोफत करणेत येणार आहे. तसेच मोतीचिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करणेत येणार आहे.
आरोग्य शिबीरामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक सांगली यांचे कार्यालयाकडून डॉ प्रमोद चौधरी, डॉ. मुजहीद अलासकर, डॉ. केदार पाटील, डॉ. रोहीत चौगुले यांनी शिबीराचे आयोजन केले. तसेच सेवासदन हॉस्पिटल, कुल्लोळी हॉसिटल, मेहता हॉस्पिटल, सुदर्शन आय हॉस्पिटल यांचे कडील डॉक्टर्स, तंत्रज्ञ व कर्मचारी यांनी सहकार्य केले.