११ वर्षांपूर्वी पास होऊनही पोलीस उपनिरीक्षक Sub-Inspector of Police पदाच्या प्रतीक्षेतनवनियुक्ती पोलीस महासंचालक तरी न्याय देणार का?…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:-पोलीस अधिकारी व्हावे, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. त्यासाठी ११ वर्षांपूर्वी हजारोंच्या संख्येने अंमलदारांनी खाते अंतर्गत परीक्षा दिली. यात उत्तीर्ण होऊनही अद्याप या अंमलदारांना अधिकारी अर्थात पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आलेली नाही.

या कालावधीत अनेक महासंचालक आले आणि सेवानिवृत्तही झाले. तरीही या अंमलदारांच्या खांद्यांवर स्टार लागलेले नाही. त्यामुळे नवनियुक्त झालेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला Director General of Police Rashmi Shukla या तरी या पोलीस अंमलदारांना न्याय देणार का? अशी आशा या पोलिसांना लागली आहे.

सन २०१३ साली दिली परीक्षा
सन २०१३ राज्यभरातील पोलीस अंमलदारांनी खातेअंतर्गत स्पर्धा परीक्षा दिल्या. कर्तव्य, घर-संसार सांभाळून या अंमलदारांनी अभ्यास करून हे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. दिवस-रात्र कठोर परिश्रम घेऊ न या अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी अद्यापही बढती देण्यात आलेले नाही. यामागे काय कारण आहे, हे समजत नाही. अनेक वर्ष झाले तरी पोलीस मलासंचालक कार्यालयातून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. या निर्णयासाठी आतापर्यंत का टाळाटाळ झाली, हे समजलेले नाही.

पास होवूनही अंमलदार म्हणूनच सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक होण्यापूर्वीच अनेक जण पास होवूनही अंमलदार म्हणूनच सेवानिवृत्त झाले तरी काही जणांना या जगाचा निरोप घेतला. उर्वरित अंमलदार आज-उद्या सेवानिवृत्त होतील. त्यापूर्वी अधिकारी म्हणून कर्तव्य बजावावे, अशी इच्छा या अंमलदारांची आहे. त्यामुळे याकडे नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुल्का या काळजीपूर्वक लक्ष देतील, अशी अपेक्षा या पोलिसांना लागलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट