हाताबुक्कीने मारहाण,, जीवे ठार मारण्याची धमकी,, राजेवाडी येथील ४ जणांवर गुन्हा दाखल

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड
जुन्या भांडणाचा राग मनात धरून हाताबुक्कीने मारहाण व जीवेठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राजेवाडी येथील चौघांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार जवाद हमीद धनसे राहणार राजेवाडी यांनी याबाबत रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


सविस्तर माहिती अशी की तक्रारदार व आरोपी हे एकाच गावातील राहणारे असून तक्रारदार रोजा उपवास सोडण्यासाठी घरी जात असताना आरोपी यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून तक्रारदार यांना हाताबुक्कीने मारहाण व शिवीगाळ केली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली. या संपूर्ण घटने प्रकरणी सऊद नमुद्दीन सावंत, सीमाफ हुरजूक, रिहान आलेकर, मुबिन आलेकर सर्व राहणार राजेवाडी या चार आरोपीं विरोधात महाड शहर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 115 (2), 351(2),351(3), 352,3(5) कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार संबंधित गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.