हरविलेले मोबाईलचा शोध घेवून मुळ मालकांना केले परत पोलीस ठाणे देवरी पोलीसांची कामगिरी….

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, श्री नित्यानंद झा,उपविभागिय पोलीस अधिकारी देवरी, श्री. विवेक पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे श्री. प्रविण डांगे, पोलीस निरिक्षक, पो.ठाणे देवरी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवरी हद्दीतील नागरिकांचे हरविलेले मोबाईल अथक प्रयत्नांनी 05 मोबाईल ज्यात 1) oppo A15s, 2) realme 9i, 3) realme Narzo 50A, 4) Infinix Hot 10 X, 5) Vivo y73 यांचा शोध देवरी पोलीसांद्वारे घेण्यात आले आहे.
दिनांक- 26/03/2024 रोजी देवरी पोलीस ठाणे येथे शोध घेण्यात आलेले 05 मोबाईल मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी श्री. विवेक पाटील. ठाणेदार देवरी श्री. प्रविण डांगे, पोलीस निरिक्षक देवरी यांचे हस्ते शोध घेवून मिळुन आलेले मोबाईल मुळ मालकांना (अर्जदारांना) परत करण्यात आलेले आहेत.. देवरी पोलिसांनी अथक प्रयत्नांनी अर्जदारांचे हरविलेले मोबाईल चा शोध घेवून परत दिल्याने अर्जदार लोकांनी मोबाईल मिळाल्याचे आनंदात देवरी पोलीसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.. हरवलेले मोबाईल शोध घेण्याकरिता श्री. प्रविण डांगे, पोलीस निरिक्षक देवरी यांच्या मार्गदर्शनात पो.शि. गोपालप्रसाद पांडे, यांनी विशेष परिश्रम घेवून कामगिरी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com