५० हजार रूपये असलेली हरवलेली बॅग एका वयोवृद्ध इसमाला परत करण्यात महाड शहर पोलीसांना यश…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड :– दिनांक 09/09/2024 रोजी दुपारी 14.30 वाचण्याचे सुमारास अनंत सिताराम कोतवडेकर वय 76 वर्षे राहणार खोपोली जिल्हा रायगड खोपोली इथून माणगाव येथे उतरले होते सणाचे अनुषंगाने गाड्यांना गर्दी असल्याने माणगाव वरून महाड स्टँड येथे उतरले त्यांना चिपळूण येथे जाण्याचे असल्याने महाड स्टँड येथून रिक्षा पकडून ते हायवे चांभरखिंड येथे उतरले होते .
तेव्हा त्यांची बॅग चुकुन रिक्षात राहिली होती, सदर बॅग मध्ये 50,000/- रुपये होते, त्यांचे बँकेचे व काही महत्त्वाचे कागदपत्र होते.सदर गृहस्थ हे त्यांचा नातेवाईक ओमकार सातांबेकर मुंबई पोलिस यांचे सहित महाड शहर पोलीस ठाण्यात आले असता तेथील ठाणे अंमलदार पोलीस हवालदार गणेश पवार यांनी मा. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना माहिती देउन त्यांचें मार्गदर्शनाने महाड येथील वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन रिक्षा संघ अध्यक्ष शेखर महाडिक, यांचेशी संपर्क साधून हवालदार गणेश पवार चालक अजय होळकर यांनी घटनास्थळी जावून सदर बॅग चा शोध घेतला असता सदरची बॅग रिक्षा चालक गणेश करवडे यांचे रिक्षात ठेवली होती ती बॅग रीक्षा अध्यक्ष महाडीक व रिक्षा चालक गणेश करवडे यांनी आणून ती ताब्यात घेऊन वयस्कर गृहस्थ अनंत सीताराम कोतवडेकर यांचे ताब्यात दिली आहे.
सदर बॅग मध्ये 50,000 रुपये होते, ते त्यांना मिळाल्याने अनंत सीताराम कोतवडेकर यांनी पोलिसांचे व रिक्षा अध्यक्ष व रिक्षा चालक यांचे आभार मानले आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com