हरम नाका, अचलपुर येथुन देशी बनावटीचे पिस्टल व २ जिंवत काडतुस जप्त, स्था.गुन्हे शाखा अमरावती ग्रामिणची कार्यवाही..

सह संपादक -रणजित मस्के
अमरावती

अमरावती जिल्हयाचे पोलिस अधिक्षक श्री. विशाल आंनद मांनी अमरावती जिल्हयात अवैधरित्या विनापरवाना शस्त्रे बाळगणा-याविरुध्द कारवाई करण्याचे अधिनस्त अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत.
त्या अनुषगाने दिनांक ०९/०७/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणचे पथकाने मिळालेल्या गोपनिय खबरेवरुन पोलिस स्टेशन सरमसपुरा हददीतील हरम नाका, अचलपुर येथुन आरोपी नामे दुर्गेश ज्ञानेश्वर विजेकर वय २१ वर्ष, रा.अब्बासपुरा, अचलपुर यास पंचासमक्ष ताब्यात घेवुन अंगझडती घेतली असता त्याचे कमरेत खोसून असलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस कि.अं.२६,००० रु चे मिळुन आले त्यास पिस्टल व काडतुस बाळगण्याचा उददेश व परवानाची विचारणा केली असता त्याने पिस्टल बाबत कोणताही परवाना नसल्याचे सागुन उडवाउडवीचे उत्तरे दिली वरुन त्याचे ताव्यातुन सदरची पिस्टल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.
आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन सरमसपुरा येथे कलम ३.२५ आर्म अॅक्ट अन्वये गुना नोदं करण्यात आला असुन आरोपी याने सदर शम्ब कोठुन आणले व त्याचा उददेश काय ? याबाबत तपास सुरु आहे. सदर आरोपीवर याआधी सुध्दा अवैधरित्या दारु विक्री करणे तसेच शरिराविरुध्दचे गभीर गुन्हे नोद आहेत.
सदरबी कारवाई मा.श्री. विशाल आनद, पोलिस अधिक्षक, मा.श्री.पंकज कुमावत, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण याचे मार्गदर्शनात श्री किरण वानखडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा., सहा. पोलिस निरीक्षक श्री.निलेश चावडीकर, ठाणेदार, पो. स्टे. सरमसपुरा यांचे नेतृत्वात सहा. पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोउपनि शिवचरण मडघे, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने चालक अनिकेत पाचपोर यांनी केली.