हप्ता मागणाऱ्या गुंडाला विमानतळ पोलीसांनी ठोकल्या बेडया

0
Spread the love
विमानतळ पोलीस ठाणे

पुणे :विमाननगर, विमानतळ पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या यमुनानगर , मंत्री आयटी पार्क येथे दिनांक 9 नोव्हेंबर 2021 रोजी टपरी चालवायची असेल तर दररोज ५०० रुपये मला हप्ता दयायचा नाही तर मारुन टाकील, अशी धमकी देऊन जबरदस्तीने ५०० रुपये घेऊन जाणाऱ्या गुंडाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे .

श्री. करण हातागळे वय २५ वर्षे (रा. यमुनानगर, विमाननगर) असे या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल रमेश ठोकळ वय ३०वषे ( रा. धर्मनगर, चंदननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. श्री. राहुल ठोकळ यांची विमाननगर येथील मंत्री आयटी पार्क येथे चहाची टपरी आहे.

श्री. करण हातागळे हा मंगळवार दिनांक 9 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी फिर्यादीच्या चहाच्या टपरीवर आला. फिर्यादी व त्यांचा कामगार इस्लास (वय २३) यांना “का रे तुम्हाला जास्त मस्ती आली काय , असे म्हणून “टपरी चालवायची असेल तर मला रोज ५०० रुपये हप्ता दयायचा तर टपरी लावायची पैसे देणार नसेल तर तुला येथे टपरी चालू देणार नाही, “असे बोलला त्यावर फिर्यादीने त्यास “तुला का पैसे दयायचे,” असे विचारल्यावर त्याने फिर्यादी व त्यांच्या कामगाराला शिवीगाळ करुन “पैसे नाही दिले तर मारुन टाकील,” अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने ५०० रुपये घेतले. विमानतळ पोलिसांनी हातागळे याला अटक
केली असून पुढील तपास विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.गांधले साहेब करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट