हाफ मर्डर मध्ये पाहिजे आरोपीतांकडुन एम.आय.डी.सी.पो.स्टे. पोलीसांनी चोरीच्या मोटारसायकल केल्या हस्तगत.

सह संपादक- रणजित मस्के
जळगांव ;
जळगाव जिल्हयामध्ये मोटार सायकल चोरीच्या वाढत्या घटना घडल्यामुळे मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेडडी सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते सो. यांनी मोटार सायकल चोरीच्या घटना उघडकिस आणुन आरोपी अटक करणे बाबत मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे मा. उपविभागिय अधिकारी श्री संदिप गावीत सो. यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना केल्या होत्या. तसेच पो.स्टे. हददीत गस्त करीत असतांना संशयीतांची सखोर चौकशी करणे कामी कळविण्यात आले होते.
दि.१६/०३/२०२५ रोजी पोउपनिरी श्री राहुल तायडे, पोउपनिरी श्री चंद्रकांत धनके, पोउपनिरी श्री रविंद्र चौधरी, पोना/प्रदिप चौधरी, पोकों/रतन गिते पोकों/सिध्देश डापकर, पोकॉ/जेकश हटकर असे पोलीस स्टेशन हददीत गस्त करीत असतांना त्यांना संशयीत नामे १) मुबीन शाह शकील शाह वय-20 रा.घर नं.119 गल्ली नं.6 सर्वे नं.213 चमन नगर मालेगांव जि. नाशिक. 2) दानिश शाह जहीर शाह वय-20 रा.घर नं. 204 चिराग शाळे मागे गांधी नगर मालेगांव जि. नाशिक 3) अमीर उर्फ अमिन शाह जहुन शाह वय-22 रा. भिस्ती मोहल्ला शाहु नगर जळगांव. हे दिसले त्यांना थांबण्याचा इशारा दिला असता त्यांनी पोलीसांना पाहुन पळ काढला तरी त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना त्यांचे कडील त्याचेकडील मो.सा.सह ताब्यात घेतले त्यांचे ताब्यातील मो.सा.बाबत विचारपुस करता त्यांनी सदर मो.सा. बाबत उडवाउडवीचे उत्तररे दिली त्यांचेवर संशय बाळयावल्याने सदर मो.सा. बाबत तांत्रिक माहिती प्राप्त केली असता सदरची मो.सा. ही मालेगांव शहर पो.स्टे. हददीतुन चोरी गेल्या बाबत माहिती मिळाली, तरी सदर आरोपीतांना एम.आय.डी.सी.पो.स्टे. गुरन/70/2025 BNS कलम 303 (2) प्रमाणे गुन्हयात अटक करुन पोलीस कस्टडी दरम्यान विचारपुस करता त्यांचे कडुन खालीलप्रामाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.क्रं.
01
पो.स्टे.व गुरन
एम.आय.डी.सी.पो.स्टे. गुरन 18/2025 BNS 303 (2)
जिल्हापे. स्टे. 34/2025 BNS 303 (2)
मालेगाव शहर पो.स्टे.
निरंक
मो.सा.चे वर्णन
2) 1,00,000/- रु.कि.ची एक बजाज विक्रांत कंपनीची काळया रंगाची लाल पटटे असलेली मो.सा.क्रं.MH-19 CK 7697 तिचा चेचीस नं.MD2A74BZ3GWM10117 इंजिन नं.JHZWGM10412 असा असलेली जु.वा.कि.अं.
गुरन 50,000/- रु.कि.ची एक हिरो स्पेल्डर कंपनीची काळया रंगाची ग्रे पटटा असलेली विना नंबरची मो.सा. तिचा चेचीस नं.MBLHA119L5F09055 इंजिन नं. HA11EVL5F58399 असा असलेली जु.वा.कि.अं.
1) 1,50,000/- रु.कि.ची एक सुझुकी बर्गमन कंपनीची पांढ-या रंगाची विना नंबरची मो.सा.तिचा चेचीस नं. MB8EA115BS8110703 इंजिन नंAF215442861 असा असलेली जु.वा. किं.अं.
50,000/- रु.कि.ची एक हिरो एच एफ डिलक्स कपंनीची काळया रंगची निळा पटटा असलेली विना नंबरची चेचीस नं. MBLHA11EWD9E04764 इंजिन नं. HA11EGD9E17177 जु.वा. किं.अं.
तरी सदर आरोपीतांकडुन जळगांव शहरातील जिल्हा पेठ, एम.आय.डी.सी. तसेच मालेगाव जि. नाशिक परीसरातुन चोरलेल्या ३,५०,०००/- रुपये किंमतीच्या एकुण ४ मो. सा. हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर आरोपी बाबत अधिक माहिती घेता त्यांचेवर आझाद नगर पोलीस स्टेशन मालेगाव जि. नाशिक येथे एका इसमास जिवे ठार मारण्याचा प्रयत्नाखाली दि.१३/०३/२०२५ रोजी गुरन ४४/२०२५ BNS कलम १०९, आर्म अॅक्ट ४/२५ वगैरे प्रमाणे दाखल असुन त्यात ते फरार आरोपी आहेत तसेच इतर मो.सा. बाबत माहिती घेवुन पुढील तपास पोलीस उपनिरी चंद्रकांत धनके, पोना/प्रदिप चौधरी पोकॉ/रतन गिते हे करत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक जळगांव श्री. महेश्वर रेडडी सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक जळगांव श्री. अशोक नखाते सो जळगांव, मा. उपविभागिय अधिकारी श्री. संदिप गावीत सो. यांचे मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी.पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.