महाविकास आघाडी तर्फे महाडमध्ये हळदीकुंकू समारंभ संपन्न!…

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड : महाविकास आघाडी तर्फे महाड शहरातील आझाद मैदानात हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमाला महाड शहर तालुक्यातील महाविकास आघाडी संबंधित पक्षातील सर्व महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.
महाविकास आघाडी तर्फे महाड शहरातील आझाद मैदानामध्ये हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला महाड शहराच्या माजी नगराध्यक्ष स्नेहलताई जगताप तसेच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाच्या अनेक प्रमुख महिला उपस्थित होत्या.
महाड शहरातील आझाद मैदानात घेण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभात मोठ्या प्रमाणावर शहरासहित तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी उपस्थिती दर्शविली . महाविकास आघाडीत सर्व एकत्र असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com