पालघर मधील गोठणपूर येथे रिपाई (आ) गटातर्फे माता रमाई जयंतीनिमित्त हळदीकुंकू समारंभाचे आयोजन संपन्न..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:– दि. ०७/०२/२४ रोजी पालघर जिल्ह्यात रिपाई (आ) च्या वतीने विविध ठिकाणी माता रमाई जयंती थाटात साजरी करण्यात आली.

पालघर शहरात गोठणपूर येथे महिला शाखेच्या वतीने माता रमाई जयंती करिता पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच आंबेडकर नगर पालघर येथे महिला कार्यकर्त्यांच्या वतीने रमाई जयंती चे उत्साहाने साजरी करण्यात आली.

त्यानिमित्त गोठणपूर शाखेच्या वतीने महिलांच्या हळदीकुंकूचे कार्यक्रम झाले. त्या समयी जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश जाधव, तालुका अध्यक्ष Ad अहमद भीमानी, अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष कुंदन मोरे, तालुका उपाध्यक्ष जागृत जाधव, राकेश जाधव, अनुसूचित जमातीचे अध्यक्ष वर्षा काटेला, मनीषा मोरे .शिवसेनेच्या सावे मॅडम, मोनिका गवळी, महिला जिल्हा उपाध्यक्ष संध्या राऊत, नगरसेविका मेहमन मॅडम, व महिला बालकल्याण समितीच्या पदाधिकारी व आंबेडकर नगर पालघर पूर्व येथील असंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

सर्वांनी रमाई जयंतीच्या निमित्ताने मार्गदर्शन करून जयंती महोत्सव थाटामाटात पार पाडला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट