हडपसर पोलीसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी परशया तिवारी, मोहम्मद अजमेरी , प्रणव जमादार व दोन विधीसंधर्षित बालकांना घेतले ताब्यात

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

त्यांचेकडून ११ दुचाकीसह १२,३०,०००/-रु.कि.चा मुद्देमाल हस्तगत
मा. पोलीस उप आयुक्त परि-५ डॉ. राजकुमार शिंदे, यांनी हडपसर पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी यांची बैठक घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. संजय मोगले, यांनी तपास पथक पोलीस अधिकारी / पोलीस अंमलदार यांची मिटींग घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत नियोजन केले.
त्यानुसार हडपसर तपासपथकाने २०/०७/२०२५ ते २७/०७/२०२५ दरम्यान आरोपी नामे १) अमन ऊर्फ परश्या भोला तिवारी वय १९ वर्षे रा. संग्राम हॉटेलच्या मागे, डी पी रोड माळवाडी हडपसर पुणे. २) मोहम्मद अशरफअली ईम्तीयाजअली अजमेरी वय २० वर्षे, रा.लेन नं.१४, सुक्रे वस्ती, रिलक्स हॉटेलजवळ, खराडी पुणे ३) प्रणव गणेश जमादार वय २० वर्षे रा. स.नं. ५६/२१ माळवाडी, वडगावशेरी पुणे. तसेच २ विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवून करून त्यांचे कडून महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकुण ११ गुन्हे उघडकीस झाले असून १२,३०,०००/- रू.कि.चा माल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये २ बुलेट, २ डयुक, १ यामाहा एफझेड, ४ स्प्लॅन्डर, २ अॅक्टीवा, अशा ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
हडपसर पोलीस स्टेशन एकुण ०५ गुन्हे १) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ६६५/२०२५ गा.न्या.सं. कलम ३०३ (२) २) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४६१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२), मुंढवा पो.स्टे ०२, बंडगार्डन पो.स्टे ०१, विमाननगर पो.स्टे ०१, विश्रामबाग पो.स्टे ०१, आणि देहुरोड पो.स्टे ०१ एकूण ११ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि ५ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अश्वीनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत
रेजितवाड, रविकांत कचरे महाविर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे, यांचे पथकाने कामगिरी केली आहे.