हडपसर पोलीसांनी पुणे शहर येथील फरारी आरोपीस जेरबंद करून १ देशी बनावटीचा कट्टा व १ जिवंत काडतुसासह केले जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

दि.३०/०६/२०२५ रोजी तपास पथकाचे प्रनारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व स्टाफ पोलीस अंमलदार महेश चव्हाण, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, भगवान हंबर्डे, माधव हिरवे, ज्ञानेश्वर चोरमले वांचे पथक पोलीस स्टेशन हद्यीमध्ये अवैध धंदे प्रतिबंधात्मक व पाहीजे फरार आरोपींचा शोध घेणे करीता पायी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार महेश चव्हाण आणि अभिजीत राऊत यांना त्यांचे बातमीदारा नार्फत बातमी मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ३२२/२०२५ भा.न्या. सं. कलम, ११८ (२),११५ (२),३५१ (२),३५२,३ (५) शस्त्र अधिनियम कलम ४(२५), महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५, कि. लॉ. अमेंटमेंट ३,७ प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी विनीत रविंद्र इंगळे हा लोहीया गार्डन हडपसर गावठाण येथे येणार आहे. तो काहीतरी संशयित विजवस्तु आपले जवळ बाळगुन वावरत आहे. मिळालेल्या बातमीचा आशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे श्री. संजय मोगले, यांना कळवली असता, त्यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनां प्रमाणे पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अभिजीत राऊत, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार, माधव हिरवे, ज्ञानेश्वर चोरमले यांचे पथकाने सापळा रचून विनीत रविंद्र इंगळे वय २४ वर्षे व्यवसाय मजुरी, रा. सातववाडी हडपसर पुणे यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ०१ देशी बनावटीचा कटटा व १ जिवंत काडतूस मिळून आले. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ६२२/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५. पुणे शहर श्री. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशनचे श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, वांचे सुचना प्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश नोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निलेश किरवे, निखील पवार, भगवान हंबर्डे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, नामदेव मारटकर, माऊली चोरमले, माधव हिरवे, रविकांत कचरे यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.