हडपसर पोलीसांनी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त, नशा मुक्ती जनजागृती अभियान अंतर्गत शाळा / कॉलेजस मध्ये कार्यक्रम

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

हडपसर

मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप, व हडपसर पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे दिनांक २५/०६/२०२५ रोजी व दिनांक २६/०६/२०२५ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नशा मुक्ती जनजागृती अभियान, व्याख्याने, पथनाट्य, शपथ कार्यक्रम तसेच रॅलीचे कार्यक्रम हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत असणा-या आण्णासाहेबमगर महाविदयालय, तसेच इतर महाविदयालय हडपसर, साधना कन्या विदयालय, एस. एम जोशी कॉलेज, मेंटोर इंटरनॅशनल स्कुल मगरपटटा व एस एन बी पी स्कुल मांजरी या शाळा व कॉलेजेसमध्ये सदरचे कार्यक्रम राबविण्यात आले तसेच पी एम टी बस स्टॉप गाडीतळ या सार्वजनिक ठिकाणी पथनाटय घेण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये १. व्यसन म्हणजे काय २. व्यसनाचे प्रकार ३. अंमली पदार्थ ओळखणे ४. अंमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर शरीरावर होणारे दुष्परिणाम ५. अंमली पदार्थाचे आरोग्यावर होणारे परिणाम व त्यापासून होणारी कायदेशीर कार्यवाही. ६. व्यसनमुक्तीसाठी शासकीय व स्वयंसेवी संस्था, व्यसनमुक्ती केंद्र माहिती ७. अंमली पदार्थ सेवनापासून उपायोजना ८. मुलांनी आणि पालकांनी घ्यावयाची काळजी ९. अंमली पदार्थ व्यसनामुळे वाढणारी गुन्हेगारी यावरील सर्व विषयावर सविस्तर चर्चा करून उदाहरणासह जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली. राबवण्यात आलेल्या मोोहिमे अंतर्गत सुमारे ६००० विद्यार्थ्यानां मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच पोलीसांना तात्काळ संपर्क करण्यासाठी टोल फ्रि क्रमांक डायल ११२ ची माहिती देण्यात आली.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५. पुणे शहर, श्री. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली बरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप, म. सपोनि हसिना शिकलगार, दिपीका जौंजाळ, पोउनि महेश कवळे, पोलीस अंमलदार समीर पांडुळे, सचिन शिंदे, प्रकाश सांवत, तेजस पांडे, स्वप्निल भुजबळ, दामिनी पथकाचे अंमलदार धनश्री बांडे यांनी कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट