हडपसर पोलीसांकडून १ देशी बनावटीचा कट्टा व १ जिवंत काडतुस जप्त

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे

दि.२२/०४/२०२५ रोजी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, अमिजीत राऊत, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार यांचे पथक पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे तसेच वाहन चोरीस प्रतिबंध करण्याकरिता पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार महेश चव्हाण आणि अभिजीत राऊत यांना त्यांचे बातमीदाराचे मार्फत बातमी मिळाली की, एक इसम संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुन्हा करणेचे उद्येशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चिजवस्तु जवळ बाळगुन वावरत आहे.

मिळालेल्या बातमीचा आशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे श्री. संजय मोगले, यांना कळवली असता, त्यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, दिपक कांबळे, अभिजीत राऊत, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार यांचे पथकाने सापळा रचून चिराग संजय सर्जेराव वय २३ वर्षे रा. अभिलाषा हाईट्सच्या मागे, डिलाईट प्राईड म्हसोबा वस्ती, झी मॉलचे समोर, मांजरी पुणे यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ०१ देशी बनावटीचा कट्टा व १ जिवंत काडतूस मिळून आले. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.४०८/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परि ५ पुणे शरह श्री. डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट