पिस्टल तसेच धारदार शस्त्रासह घरफोडी करणाऱ्या टोळीस हडपसर पोलीसानी अटक करुन १,२२,४४०००/-किंमतीचा मुददेमाल केला हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे:- पिस्टल तसेच धारदार हत्यारांसह दरोडा, घरफोडी करणाऱ्या टोळीस अटक करून टोळीकडून सव्वाकिलो सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, ३ पिस्टल १४ जिवंत काडतुस चोरीची एकुण १० वाहने (०६ चारचाकी व ०४ दुचाकी वाहने) असा एकूण १,२२,४४,०००/किंमतीचा (एक कोटी, बावीस लाख चव्वेचाळीस हजार रूपये) मुददेमाल हस्तगत करण्यात आला.

दि. ०९/०९/२०२३ रोजी हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजि. नंबर- १३४५/२०२३ भा.दं.वि. कलम ३९५, ३९७, ५०४, ५०६, आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पो.अधि कलम ३७ (१) (३) सह १३५ या गुन्हयातील आरोपी हे गुन्हयात वापरलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीसह फुरसुंगी गावातील सोनारपुलाजवळील झाडींमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा, युनिट-३ ला प्राप्त झाली. त्यानुसार वपोनि श्रीहरी बहिरट गुन्हे शाखा, युनिट ३, पुणे शहर यांनी गुन्हे शाखा, युनिट ३ कडील अधिकारी व अंमलदार हे सदर ठिकाणी पोहचले. तेथील भौगोलिक परीस्थिती पाहता आणखी पोलीसांची कुमक आवश्यक असल्याने त्यांनी मिळालेल्या बातमी व पोलीस मदतीबाबत अमोल झेंडे पोलिस उप आयुक्त, गुन्हे यांना कळविले असता ते तात्काळ सुनिल तांबे, सपोआ गुन्हे १, पुणे शहर तसेच युनिट २, खंडणी विरोधी पथक १, दरोडा व वाहनचोरी पथक १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह सदर ठिकाणी आले. तेथील झाडी तसेच रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी तीन पथके तयार करून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी नियोजनबध्द सापळा लावला.

नमुद पोलीस पथकांनी विभागून सदर परीसरास झाडीमध्ये असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीला घेराव घालुन गाडीच्या जवळ जात असता त्यांना पोलीसांची चाहुल लागल्याने गाडीच्या बाहेर असलेले दोन आरोपी पळून जावू लागले व एका आरोपीस पळुन जाता न आल्याने गाडी लॉक करून गाडीमध्ये लपून बसला. पोलीसांच्या एका पथकाने गाडीजवळ जावुन गाडी लॉक असल्याने गाडीची काच फोडून त्यास ताब्यात घेतले व इतर दोन पथकानी पळून जात असलेल्या आरोपींचा रात्रीच्या अंधारात घनदाट झाडींमधून जिवाची पर्वा न करता पाठलाग करून त्यांना पकडले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे १) अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी वय २३ वर्षे रा. बहात्तर वस्ती, पाण्याच्या टाकी जवळ मांजरी पुणे २) बच्चनसिंग जोगीदंरसिंग भोंड वय २५ वर्षे रा. गोसावी वस्ती, बिराजदार नगर, श्री साई सोसायटी समोर लेन नं ७, वैदवाडी पुणे, ३) विधीसंघर्षीत बालक रा. तुळजाभवानी वसाहत, बंटर शाळे पाठीमागे हडपसर पुणे अशी आहेत.

सदरची कारवाई मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, मा. संदीप कर्णिक, सह पोलीस आयुक्त सो, मा. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त सो गुन्हे, मा. अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त सो गुन्हे यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार मा. सुनिल तांबे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, गुन्हे शाखा, युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्रीहरी बहिरट, खंडणी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, दरोडा व वाहनचोरी पथक-१, गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर तसेच युनिट ३ कडील पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, अजितकुमार पाटील, राजेंद्र पाटोळे, विकास जाधव, शाहीद शेख, तसेच पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, उत्तम तारू, गणेश ढगे, संजय भापकर, सयाजी चव्हाण, किरण ठवरे, दुर्योधन गुरव, संभाजी गंगावणे, किरण पवार, संजिव कळंबे, सुरेंद्र साबळे, सुजीत पवार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, साई कारके, दिपक क्षिरसागर, राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, प्रकाश कटटे, निखिल जाधव, साईनाथ पाटील, प्रताप पडवाळ, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट