हातचलाखी करुन फसवणुक करणा-या सराईत आरोपीतास युनिट ६ पथकाने केले जेरबंद

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :- दि.०४/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ हद्दीमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथक असे लोणीकाळभोर हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पो.अं. १०४५२ शेखर काटे यांना बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, बतावणी व हातचलाखी करून लोकांची फसवणुक करणारा सराईत रेकॉर्डवरील आरोपी नामे मजलूम हाजीअली सय्यद इराणी, वय ४९ वर्षे, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि.पुणे हा सदर राहते वस्तीत आला आहे. त्यावरून सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्यास कक्ष कार्यालयात आणून त्याचेकडे पथकाचे मदतीने कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याचा खालील गुन्हयांमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे. १) सुपा पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हा रजि. नं. २८५/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०३(२) २) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २६६/२०२४, भा.द.वि. कलम ४२०, ३४

नमुद आरोपीविरूद्ध पुणे, मुंबई, ठाणे इत्यादी ठिकाणी फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीताकडुन अंगझडती पंचनाम्या अंतर्गत रु.४०००/- हस्तगत करण्यात आले आहेत. त्यास पुढील तपासकामी जप्त रकमेसह सुपा पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट -६ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पो. हवा. बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, पो.ना. नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पो.अं. शेखर काटे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, समीर पिलाने, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट