गुरुब्रम्हा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु: साक्षात परब्रम्हा तस्मे श्री गुरुवै नमः श्री. गोरक्षनाथ मंदिर माणगांव येथे गुरुपौर्णिमा 2023 उत्सहात साजरी…

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव :- झालिया सद्गुरु प्राप्तीईश्वर कृपेने घडे भक्ती, सद्गुरू तोचि ईश्वर मूर्ती, वेदशास्त्री समंत,एकनाथी भागवतया पवित्र व पावन भूमिचे महंदभाग्य म्हणून प्रत्येक पिढीला कोणीतरी महापुरुष जन्माला येऊन जडजीवानां जीव जगत जगदिशाचे सत्य ज्ञान करीत असतात. आपल्यालाही या आत्मज्ञानाचे जे सत्याचे झाले आहेत असे विश्व मान्य ग्रंथ गीता ज्ञानातून मानव जातीच्या मन व बुद्धीत परिवर्तन घडविण्यासाठी स्वतः ची शिदोरी स्वतः खर्च करून ज्यांनी आपले सारे आयुष्य या सेवेतच व्यतीत केले असे नाथ सांप्रदायांचे महान तपोनिधी प. पु. सद्गुरु माऊली श्री.बेटकर महाराज हे ही या पिढीतील एक भगवदविभूतीचे अर्थात ईश्वर मूर्तिच आहेत भगवत कृपेनें भाग्यवंत शिष्यगनहो आपणास असे सद्गुरु लाभले हे आपले परमभाग्यच होय या संसाररुपी भवसागरातुन पार होण्यासाठी मनुष्य योनीतच आत्मज्ञान प्राप्त करून घेता इतर योनीत नाही.

एक एक योनी, कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा, काय वानू मी या सद्गुरूचे उपकार, मज निरंतर जागविता ज्या सद्गुरूंनी आपल्याला परस्त्री माते समान, दारू, मटका, जुगार, बंदीची शपथ देऊन संसाराची दुर्दशा करण्याऱ्या व्यसनापासून दूर केले नाम व ज्ञानरुपी आत्मज्ञानाला बोध करून दिव्य साधना दिली अशा सद्गुरू माऊलीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या कुळासह सद्गुरू माऊलीच्या दर्शनासाठी यावे आपल्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीवर हे संस्कार कायमचे ठसावेत व सुखी संसाराची गुरुकिल्ली जाणून घ्यावी हे सर्व रूपरेषा गोरक्ष मंदिर माणगांव येथे शिकण्यात येते.

श्री. गोरक्षनाथ मंदिर ढालघर फाटा माणगांव येथे आज दि.२ जुलै रोजी गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून सायंकाळी ६ ते ८ च्या दरम्यान पंपोपचार पुजा,यज्ञविद्या,महाआरती व तीर्थप्रसाद ८ ते ९ रायगड भूषण प. पु.गुरुवर्य श्री. दादा महाराज शिंदे यांचे गुरुपौर्णिमेच्या निमित्त प्रबोधन ९ ते १० महाप्रसाद १० ते १२ हरिजागर श्री. नाथसांप्रदाय भजन मंडळ व नवीन नामधारक दिक्षाविधी तसेच रात्री १२ नंतर प. पु सद्गुरू माऊली बेटकर बाबाच्या पादुकाचे पूजन व्यास पूजा व दर्शन सोहळा अशा प्रकारे गुरुपौर्णिमा मोठया संख्येने पार पडला.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com