गुन्हे शाखा, मुंबई यांच्याकडून अभिलेखावरील गंभिर गुन्हयातील आरोपीस ताब्यात घेवून ११ गुन्हे केले उघडकीस

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

मुंबई

कक्ष-७ कार्यक्षेत्रातील कांजूरमार्ग पोलीस ठाणे हद्दीत राहणारा आरोपी नामे शिवा आरमोगन शेटट्टी हा दिनांक २२/०१/२०२५ रोजी कांजूरमार्ग पोलीस ठाणे, गु.र.क्र.०१/२०२२, कलम ३९९, ४०२, ३०७, ३५३, ३३२, ३२३, ३४ भादंवि सह ४, २५ आर्म्स अॅक्ट सह १३५ मपोका सह ३ (१) (ii), ३(२), ३(४) मोक्का कायदा (MCOCA) या गुन्हयातुन जामिनावर मुक्त झाला होता. नमुद आरोपीवर जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभिर गुन्हे दाखल असल्याने कक्ष-७कार्यालयाकडून नमुद आरोपीस त्याचे राहते पत्त्यावर जावून वारंवार तपासले जात होते. परंतु काही दिवसांपासून आरोपी हा त्याचे राहते घरी मिळून येत नव्हता. सदर आरोपीने नवी मुंबई, ठाणे तसेच पालघर परीसरात घरफोड्या केल्याचे समजून आले होते.

कक्ष-७ च्या पथकास नमुद आरोपी हा कळवा, जि. ठाणे परीसरात भाडयाचे खोलीत त्याचे पत्नीसह वास्तव्यास असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. कक्ष-७ चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपास तसेच मानवी कौशल्याच्या आधारे नमुद इसमास कळवा, जि.ठाणे येथून ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने जेलमधुन जामिनावर बाहेर आल्यानंतर नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर तसेच पालघर परीसरात घरफोड्या व जबरी चोरी केल्याची कबुली दिल्याने संबधित पोलीस ठाण्याशी संपर्क करून सदर बाबत खात्री केली असता नमुद आरोपीनेच सदरचे गुन्हे केल्याची खात्री झाली. त्यामुळे नमुद आरोपीस पुढील कार्यवाहीकरीता खारघर पोलीस ठाणेच्या (नवी मुंबई) ताब्यात देण्यात आले आहे.

अटक आरोपीताचे नाव शिवा आरमोगन शेटटी, वय-२९ वर्षे, रा.ठी.ओ-४/१०६, विघ्नहर्ता सोसायटी, कर्वे नगर, कांजूरमार्ग, भांडूप पूर्व, मुंबई

सदरची चांगली कामगिरी मा. पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. विशाल ठाकूर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) श्री. चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-७ चे प्र.पो.नि., श्री. आत्माजी सावंत, म.पो. नि. राजश्री बाळगी, स.पो.नि.धनाजी साठे, पो.उ.नि. स्वप्निल काळे, पो.उ.नि. महेश शेलार, पो.उ.नि. नामदेव परबळकर, स. फौ. दिपक पवार, स.फौ. गुख, पो. हवा. सुभाष मोरे, पो. हवा. अजय बल्लाळ, पो.हवा. विनोद शिरापुरी, पो. हवा. सचिन गलांडे, पो. हवा. विलास राऊत, पो. हवा. हर्षल पाटील, पो.हवा. प्रमोद शिंदे, पो.शि.विकास होनमाने, पो.शि. महेश सावंत, पो. शि. जितेंद्र पाटील यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट