गुंडेवाडी शिवारात जुगार अड्डावर छापा 11 आरोपीकडून 34,08,524/- रुपये किंमतीचे रोख रक्कम, जुगार साहित्य जप्त स्था. गुन्हे शाखा जालनाची कारवाई

सह संपादक -रणजित मस्के


जालना
मा. पोलीस अधिक्षक श्री. अजय कुमार बंसल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांनी जालना जिल्ह्यातील जुगार अड्डावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
दिनांक 21/06/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांना खब-या मार्फत गुंडेवाडी शिवारातील मधुकर निकाळजे याचे शेतामध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सायंकाळी 19:30 वाजता तांदुळवाडी खुर्द शिवार गट नं. 27 मधील मधुकर मोहनराव निकाळजे यांचे शेतामध्ये चालु असलेल्या जुगार अड्डयावर अचानक छापा मारला आहे. त्याठिकाणी पत्र्याच्या शेडसमोर मोकळ्या जागेवर गोलाकार लावलेल्या टेबलावर 1) नारायण भगवान काळे वय 38 वर्ष रा. पोकळवडगाव ता. जालना 2) संतोष शंकर काळे वय 35 वर्ष रा. संजयनगर देऊळगाव राजा जि. बुलडाणा 3) बाळु संपतराव वाघमारे वय 27 वर्ष रा. पीर पिंपळगाव ता. जि. जालना 4) शेख ईस्माईल शेख इसा वय 40 वर्ष रा. पीर पिंपळगाव ता. जि. जालना (5) बबन माधवराव म्हस्के वय 55 वर्ष रा. माळशेंद्रा ता.जि. जालना 6) राजन छगन वाघमारे वय 48 वर्ष रा. खडकपुरा देऊळगाव राजा 7) गोरख गुलाबा आढे वय 40 वर्ष रा. मोहाडी तांडा ता.जि. जालना 8) जावेदखान मोहंमद खान वय 45 वर्ष रा.गारखेडा सुतगिरणी छत्रपती संभाजीनगर 9) प्रकाश आगाजी वाहुळे वय 58 वर्ष रा. दरेगाव ता.जि. जालना 10) संदीप नारायण चव्हाण वय 43 वर्ष रा. आडगावराजा जि. बुलडाणा 11) प्रदीपकुमार अर्जुनराव तांबिले वय 57 वर्ष रा.डोणगाव ता. जाफ्राबाद जि. जालना यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेकडील रोख रक्कम व जुगार साहित्य, तसेच घटनास्थळावरील वाहने असा एकुण 34,08,524/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध सपोनि, योगेश उबाळे, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांचे तक्रारीवरुन पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि.श्री. योगेश उबाळे, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, रुस्तुम जैवाळ, कैलास खाडे, प्रशांत लोखंडे, लक्ष्मीकांत आडेप, संभाजी तनपुरे, रमेश काळे, कैलास चेके, योगेश सहाने, धिरज भोसले, सोपान क्षीरसागर, अशोक जाधवर सर्व स्थागुशा जालना यांनी केली आहे.