गांजा बाळगणाऱ्या गुजरातच्या दोघांना काशिमिरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मिरा रोड :-गांजा बाळगणाऱ्या गुजरातच्या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई काशिमीरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईमुळ मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात अंमली पदार्थ विक्री करणारे तसेच बाळगणारे व्यक्तींचा शोध घेवुन त्यांचेविरूध्द कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत मुंबईकडे जाणारे वाहिनीवर मन ओपस बिल्डिंग जवळील पडक्या घराजवळ पारस धिरुभाई चावडा (वय ३० वर्षे, रा. बी/१३, स्वप्न व्हिला, सत्यमनगर, कामरेज, जिल्हा सुरत गुजरात), पुष्पक महेंद्रसिंग चौहान (वय २८ वर्षे, रा. रूम नं ५०३, भगवती अव्हेन्यु, सत्यमनगर, ननसाडरोड, कामरेज, जिल्हा सुरत, गुजरात) हे इसम संशयास्पद रित्या वावरताना दिसले. पोलिसांनी त्यांच्या बॅगची झडती घेतली असता त्यात ८० हजार रुपयांचा ४ किलो गांजा व दोन मोबाईल असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात (गु रजि नं २२१/२०२४, एन.डी.पी.एस १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २९) गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनिरी शिवाजी खाडे नेम काशिमिरा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

ही कारवाई प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-१), डॉ. विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त., (मिरारोड विभाग), व.पो.नि/ राजेंद्र कांबळे, पो.नि समीर शेख (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी शिवाजी खाडे, सपोउपनि पवार, इगवे, हवालदार मोहिले, सोनकांबळे, निलेश शिंदे, सतिश निकम, अंमलदार. रविंद्र कांबळे, राजेंद्र सुर्यवंशी यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट