गोंदिया जिल्हात शाळेकरी मुला मुलींना “गुड टच व बँड टच” विषयावर दामिनी पथक व भरोसा सेल यांचे मार्गदर्शन…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्ह्यात महिला, लहान मुले -मुली, बालके, शाळकरी विद्यार्थी , युवक- युवती यांचे सुरक्षितता, महीला व बालके त्त्यांच्यावर होणारा अत्याचार रोखण्यासाठी दामिनी पथक व भरोसा सेल कार्य करीत आहे…. आणि यांकरिता दामिनी पथकाद्वारे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये अश्या ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते आणि महीला, लहान बालके , मुले – मुली यांचे सुरक्षितता संबंधाने जनजागृतीद्वारें माहिती देण्यात येत आहे…..
याचाच एक भाग म्हणून पोलीस निरीक्षक योगीता चाफले, भरोसा सेल तथा प्रभारी अधिकारी दामीनी पथक यांचे नेतृत्वात लिटील फ्लॉवर इंटर नॅशनल स्कुल गोंदिया येथे भेट देवून शाळेकरी मुला मुलींना “गुड टच व बँड टच” या विषयावर प्रोजेक्टरच्या माध्यमाद्वारे जनजागृतीपर व्हिडीओ क्लिप दाखवुन तसेच लहान मुला मुलींना प्रत्येक्षात प्रात्येक्षीक करुन दाखविण्यात आले. व लहान मुलांविषयी घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना कश्या रोखता येऊ शकतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे…. तसेच आत्मसुरक्षा करुन स्वतःचे बचाव कसे करता येईल याबाबतसुध्दा मार्गदर्शन करण्यात आले.. त्याच प्रमाणे शाळेकरी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या….
सदरचे स्तुत्य उपक्रम पोलीस निरीक्षक योगीता चाफले, यांचेसह मपोशि मंजुटे, मपोना, बघेले, चामपोशी पाचे, दामीनी पथक आणि भरोसा सेल यांचेद्वारे करण्यात आले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com