राजे छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिवादन..

0
Spread the love

महाड प्रतिनिधी-अनिकेत तांबे

रायगड : दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी किल्ले रायगडवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत.

किल्ले रायगड पर्यटकाना सुचना

याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रायगड किल्ला 7 डिसेंबर 2021 पर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रायगड-अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आलीय.

दिनांक 3 डिसेंबर २०२१ ते दिनांक 7 डिसेंबर २०२१ दरम्यान किल्ले रायगडबरोबरच रायगड रोप-वेही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाने म्हटलं आहे.

रायगडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

पर्यटकांची गौरसोय होवू नये म्हणून या हेतूने दौऱ्याच्या दोन दिवस आधीच ही माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट