मुंबई नगरीचे आद्य शिल्पकार थोर समाजसेवक भारतीय रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांची १५८ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी…

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश वैद्य

मुंबई:

मुंबई सुवर्णकार संघ कार्यालय झवेरी बाजार ,मुंबई सुवर्णकार संघ चौक येथे सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ सकाळी १२ वाजता थोर समाज सुधारक नामदार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांंची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

मुंबई सुवर्णकार संघाचे संयुक्त चिटणीस श्री.रवींद्र देवरुखकर ,सह खजिनदार श्री सत्यविजय मोंडकर ,झव्हेरी बाजार विभागाचे अध्यक्ष श्री अमरनाथ घोसाळकर , सह चिटणीस श्री.विठ्ठल ताटोला यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.मुंबई सुवर्णकार संघाचे सरचिटणीस श्री.अदिप वेर्णेकर, व कार्यकारणी सदस्य श्री. अशोक सोनी,श्री.सत्यविजय कारेकर यांनी नानां च्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली.सर्व उपस्थित बांधवांनी पुष्पांजली अर्पण केली. व २ मिनिट उभे राहून आदरांजली वाहिली. मुंबई सुवर्णकार संघाचे सरचिटणीस श्री अदिप वेर्णेकर यांनी नानांच्या कार्याचा व दानत्वाची प्रशंसा करून थोडक्यात आढावा घेऊन देशातील लाखो सुवर्णकारांचे श्रद्धास्थान असलेल्या नानाचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनल ला देण्यात येईल असे आत्मविश्वासपूर्वक सांगितले. व मुंबई सेंट्रल टर्मिनल नाना शंकरशेट यांचे नाव देण्यासाठी फार मोठे योगदान देत असलेल्या नाना शंकरशेट प्रतिष्ठान चे कौतुक केले.मुंबई सुवर्णकार संघाचे सभासद श्री.संतोष कुळे, श्री.संदीप बांदोडकर,श्री.अरविंद पिसाट,श्री.प्रदीप जामसंडेकर,श्री.शैलेश कारेकर,श्री.रुपेश कराडे,श्री. मिलन मैती,श्री.प्रदीप रॉय, श्री.राजा मंडल ,श्री. महेंद्र लवेकर,श्री. विनोद चव्हाण ,श्री.सुनिल पोतदार,श्री.श्रीकांत तळेकर, श्री.राजेश एकबोटे,श्री.शशांक पिसाट ,कु.सोनल जाधव ,कु .यशश्री एकबोटे असे अनेक सुवर्णकार बांधव नानांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट