अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषद दैवज्ञ साहित्य मंच तर्फे भव्य कविसंमेलन संपन्न..

संपादक- दिप्ती भोगल
मुंबई:– शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी भव्य कविसंमेलन हरी महादेव वैद्य सभागृह येथे संपन्न झाले.
▪️सुप्रसिद्ध कवी उंच माझा झोका..फेम अरुण म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थान समाजश्रेष्ठी डॉ.गजानन रत्नपारखी यांनी भूषविले होते.

▪️ज्ञातीतील नामांकित आणि नवोदित कवींनी या संमेलनात सहभाग घेऊन उस्फूर्तपणे कविता सादर केल्या. मानवी स्वभाव,जीवन,ना.नाना शंकरशेट,राम मंदिर आदि विषयांवरील स्वरचित सर्व वयोगटातील कवींच्या कवितांना सभागृहातील सुमारे १५० हून अधिक उपस्थितांनी दाद देऊन मनमुराद आनंद घेतला.

▪️कवी अरुण म्हात्रे यांनी मार्गदर्शनपर केलेल्या भाषणाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. समाजश्रेष्ठी डॉ.गजानन रत्नपारखी यांनीही शेरोशायरी करत मनोगत व्यक्त केले.
▪️ सर्व कवींचा प्रशस्तीपत्रक,पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.भेटवस्तू गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन च्या वतीने पुरस्कृत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश ,ना.नाना शंकरशेट आणि थोर साहित्यिक नाथ माधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
▪️व्यासपीठावर प्रमुख पाहुणे, अध्यक्षांसमवेत समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर दैसप उपाध्यक्ष डॉ.आनंद पेडणेकर,सूर्यकांत कल्याणकर, ॲड.मनमोहन चोणकर,सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर,दैवज्ञ साहित्य मंचचे कार्याध्यक्ष प्रा. श्याम भुर्के, सहकार्याध्यक्षा प्रा.डॉ.सौ.अनुराधा पोतदार, माजी संमेलनाध्यक्ष, दैसप विश्वस्त रवींद्र माहिमकर उपस्थित होते तर सभागृहात पदाधिकारी,सर्व विभागीय ,विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी व साहित्य रसिक आवर्जून उपस्थित होते.
▪️आभार प्रदर्शन साहित्य मंच चिटणीस ॲड.सौ.प्रतिभा पोतदार यांनी केले.
यानंतर दैसप मध्यवर्ती समितीच्या मुंबई विभागाची सभा संपन्न झाली.
कविता गुणगुणत स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेत या कविसंमेलनाचा समारोप झाला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com